बेळगाव : सार्वजनिक हिताचे रक्षण करताना नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याने शहरातील पथविक्रेत्यांनी महापालिकेला सहकार्य करून सौहार्दाचे वातावरण कायम ठेवावे, असे आवाहन महापौर प्रीती कामकर यांनी केले. मंगळवारी बेळगाव महानगरपालिकेत झालेल्या तात्पुरत्या पथविक्रेता समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. रस्ते व पादचारी मार्ग वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या वापरासाठी मोकळे ठेवण्याबाबत …
Read More »साखर साठेबाजीला लगाम; ४ हजार क्विंटलची कमाल मर्यादा
दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा दणका; ३० दिवसांपेक्षा अधिक साठा केल्यास कारवाई बेळगाव : साखरेच्या दरवाढीच्या पार्श्वभूमीवर साठेबाजीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. साखर व्यापारी, घाऊक वितरक आणि संकलन केंद्रांवर साठवणुकीची कडक मर्यादा घालण्यात आली असून, कोणत्याही व्यापाऱ्याला ३० दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा ठेवता येणार …
Read More »वाहतूक नियमांची पायमल्ली; उत्तर विभागात आठवडाभरात पावणेदोन कोटींचा दंड
बेळगावसह पाच जिल्ह्यांत १७,६३२ वाहनचालकांवर कारवाई; ७८.५८ लाखांचा दंड वसूल बेळगाव : वाहतुकीला शिस्त लागावी आणि रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी वाहतूक नियमांची अंमलबजावणी केली जात असतानाही वाहनचालकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे. उत्तर विभागातील पाच जिल्ह्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल १७ हजार ६३२ …
Read More »प्रेमाच्या धाग्याने सजली बाजारपेठ; रक्षाबंधनासाठी राख्यांची रेलचेल
बहिणींची भावाच्या आवडीची राखी निवडण्यासाठी लगबग; कार्टून, लाइटिंगसह अँटिक राख्यांना विशेष पसंती बहिण-भावाच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा अधिक घट्ट करणारा रक्षाबंधनाचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भावाच्या मनगटावर राखी बांधताना बहिणीच्या डोळ्यांत उमटणारे प्रेम आणि भावाच्या चेहऱ्यावर खुलणारे समाधान या भावनिक क्षणाची आतुरता आता बाजारपेठेतही जाणवू …
Read More »इस्कॉनतर्फे शुक्रवारी बलराम जयंती
बेळगाव : भगवान बलराम यांचा प्राकट्य दिवस हा इस्कॉन चळवळीमध्ये बलराम जयंती म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस शुक्रवार दि. 28 रोजी साजरा होत असून त्यानिमित इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिर, शुक्रवार पेठ टिळकवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता अभिषेक, सात …
Read More »येळ्ळूर विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धांना सुरूवात
येळ्ळूर : जीवनात मन आणि मनगट घट्ट असेल तर ती व्यक्ती यशस्वी होते त्यासाठी विद्यार्थी दशेतच आपले मन व मनगट मजबूत बनवा, क्रीडा हा उपजत गुण आपला स्वभाव धर्म आहे त्याचा विकास करावा त्यासाठी क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे असे उद्गार श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचे संस्थापक श्री. वाय. एन. …
Read More »ईद-ए-मिलादनिमित्त बेळगावात वाहतूक मार्गात मोठे बदल; २६ ऑगस्टला सकाळी ८ पासून निर्बंध
बेळगाव : ईद-ए-मिलाद सणानिमित्त २६ ऑगस्ट रोजी बेळगाव शहरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी यासाठी शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. हे वाहतूक निर्बंध मिरवणूक संपेपर्यंत लागू राहतील. मिरवणुकीला पिंपळ कट्टा येथून सुरुवात होऊन फोर्ट रोड, मुजावर खूट, सेंट्रल बस स्टँड, मार्केट पोलीस स्टेशन …
Read More »रेशन सर्व्हरच्या समस्येने दुकानदार, लाभार्थी त्रस्त; वितरण व्यवस्था ठप्प
बेळगाव : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (रेशन) सर्व्हरमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने बेळगाव जिल्ह्यातील रेशन दुकानदारांसह लाभार्थीही त्रस्त झाले आहेत. एका लाभार्थ्याचा अंगठा घेऊन रेशन वितरणाचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी १५ ते २० मिनिटांपासून तब्बल एक तासापर्यंत वेळ लागत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे. राज्यभर रेशन धान्याची उचल उशिराने झाल्याने …
Read More »गणेशोत्सवापूर्वी येळ्ळूर येथील वीज वाहिन्यांची दुरुस्ती करा; येळ्ळूर म. ए. समितीचे हेस्कॉमला निवेदन
झाडांच्या फांद्या तोडण्यासह वीज बिल कमी करण्याची ही मागणी बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येळ्ळूर येथील शिवाजी रोडवरील विद्युत वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच विद्युत वाहिन्यांना धोकादायकरीत्या लागलेल्या झाडांच्या फांद्या छाटाव्यात, अशी मागणी येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने हेस्कॉमकडे करण्यात आली. यासंदर्भात मंगळवारी (दि. २५) रोजी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात …
Read More »ईद-ए-मिलादनिमित्त बेळगावात २४ तास दारूबंदी
बेळगाव : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात २४ तास दारूबंदी लागू करण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि शांततेला गालबोट लागू नये, यासाठी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी तथा पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी दारू विक्रीवर निर्बंध घालण्याचा आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार बुधवार, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta