


बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतन शाळेची इयत्ता चौथीची विद्यार्थिनी सोमी मारुती पाटील हिने कुल्फी अंकातर्फे घेण्यात आलेल्या ‘लिहितं व्हा’-२०२६ या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेमध्ये लेखन करण्यासाठी लेखन प्रकारांतर्गत काही विषय देण्यात आले होते. यामध्ये 182 मुलांनी आपलं लेखन पाठवलं, 32 जिल्हे व 82 शाळांतून लेखन सहभाग होता. यामध्ये सोमीने बेळगावमधून उल्लेखनीय यश संपादन केले. सातवीतील अद्वैत तनया वैभव जोशी, चिंतामणराव केळकर विद्यालय,चेंढरे (अलिबाग), दहावीतील नम्रता रविकांत सिद्ध,महात्मा गांधी विद्यालय (आष्टा), सोमी मारुती पाटील-इयत्ता चौथी मराठी विद्यानिकेतन, बेळगाव, पाचवीतील निवा महेश सोवनी, दादासाहेब दांडेकर विद्यालय(भिवंडी), सहावीतील आराध्य चैतन्य दांडेकर, जिल्हा परिषद शाळा गुडघे (रत्नागिरी), दहावीची विद्यार्थिनी भूमी पवार (सेक्रेड हार्ट स्कूल, कल्याण), सातवीतील
सोनाक्षी शिंदे (पद्माराजे गर्ल्स हायस्कूल-कोल्हापूर),
7वीतील रितू वृंदा गणेश हंजगे (वि स खांडेकर प्रशाला-कोल्हापूर) हे या स्पर्धेतील विजेते आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात या विजेत्यांची एक अनुभवशाळा पुण्यात संपन्न होणार आहे यात चांगलं लेखन करणाऱ्या मुलांना जगभरातल्या बालसाहित्याचा, चित्रांचा इतर काही कलाकृतींचा अनुभव देण्याचा प्रयत्न असेल. शिवाय माधुरी पुरंदरे आणि वसीम मणेर या मुलांना मार्गदर्शन करतील, जेणेकरून आणखी चांगलं लेखन करायला सुयोग्य दिशा मिळू शकेल.
सोमीला प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी.जी. पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, स्पर्धा विभाग प्रमुख मुक्ता आलगोंडी, शाहीन शेख, पालक यांचे मार्गदर्शन मिळाले.

Belgaum Varta Belgaum Varta