Tuesday , October 6 2026
Breaking News

निपाणीत घरकुलांसाठी गुरुवारी आरपीआयचे नगरपालिकेसमोर आंदोलन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील राजीव गांधी आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना नगरपालिका प्रशासनाने अद्याप घरांचा ताबा दिलेला नाही. त्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गुरुवारी (ता.८) नगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आरपीआय तर्फे प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

निवेदनातील माहिती अशी, प्रशासनाकडून यापूर्वी घरकुल वाटपासाठी वारंवार आश्वासने आणि मुदती देण्यात आल्या. मात्र, ७ ऑक्टोबरपर्यंत घरांचा ताबा देण्याचे आश्वासन देऊनही पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही. त्यामुळे ८ ऑक्टोबर पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या निपाणी तालुका कमिटीच्या नेतृत्वाखाल आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनात घरकुल लाभार्थी, आरपीआय पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या घरांचा प्रत्यक्ष ताबा मिळेपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. प्रशासनाने केवळ आश्वासने न देता घरकुलांचा प्रश्न प्रत्यक्षात मार्गी लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून घरकुलांच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा आणि तयार झालेल्या घरांचा ताबा तातडीने देण्यात यावा, यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हा आरपीआय अध्यक्ष उत्तम कांबळे, प्रा. डॉ. अच्युत माने, उपप्राचार्य रवींद्र दिवाकर बेळगाव जिल्हा अध्यक्ष महावीर साने, निपाणी तालुकाध्यक्ष राहुल कट्टी, उपाध्यक्ष आकाश सुतार, कार्याध्यक्ष रोहित वने, निपाणी शहराध्यक्ष चंद्रकांत खातेदार, शहर उपाध्यक्ष आकाश कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

नवरात्रोत्सवासाठी मंडप, देखावे उभारणीला वेग

Spread the love  रोषणाईने शहर उजळणार; गरबा-दांडियासह धार्मिक सांस्कृतिक कार्यकम निपाणी (वार्ता) : नवरात्रोत्सवाच्या प्रारंभासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *