Friday , October 23 2026
Breaking News

पुण्याच्या MPSC आंदोलनात घुमला सीमालढ्याचा जयघोष

Spread the love

 

“बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे”च्या घोषणेने सीमावासीयांचे लक्ष वेधले

पुणे : पुणे येथे एस. एम. जोशी पुलाशेजारी MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, या आंदोलनाला महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी बेळगावहून पुण्यात जाऊन प्रत्यक्ष भेट देत पाठिंबा दिला.

या वेळी कोल्हापूरचा MPSC विद्यार्थी विवेकानंद पाटील याने महाराष्ट्र अखंड ठेवण्याचे आवाहन करताना “बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” असा सीमालढ्याचा जयघोष केला. तसेच, “या चळवळीसाठी १०७ हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे. पुन्हा या लढ्यासाठी रक्त सांडण्याची वेळ आली, तर १०८ वा हुतात्मा मी असेन,” अशी भावनिक भूमिका व्यक्त केली. त्यांच्या या घोषणेने पुण्यातील आंदोलनस्थळी उपस्थित सीमावासीयांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.

MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देतानाच महाराष्ट्र अखंड ठेवण्यासाठी आणि बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील तरुणाईने एकत्र येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके, उपाध्यक्ष नारायण मुचंडिकर, अशोक घगवे, सूरज जाधव, निलेश काकतकर, सचिन दळवी, श्रीकांत बुवा तसेच महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभागाचे गणपती पाटील, विश्वनाथ पाखरे, वैराळ सुळकर, गंगाराम वीर, सातेरी पाटील, भुजंग पाखरे, मारुती पाटील, हनुमंत पाटील, संदीप बावकर, अर्जुन वीर, संतोष कुंभार, परशुराम पाटील, कार्तिक पाटील, भडकू बुत्ते वाडकर, विनायक आदी उपस्थित होते.

MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सीमाभागातून मिळालेला हा पाठिंबा आणि पुण्यात घुमलेला सीमालढ्याचा जयघोष महाराष्ट्राच्या एकात्मतेच्या लढ्याला नवी ऊर्जा देणारा ठरला.

About Belgaum Varta

Check Also

वीस दिवसांच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा गजबजल्या!

Spread the love  विद्यार्थ्यांची शाळेकडे धाव; दुसऱ्या सत्राला प्रारंभ, सहामाही निकालाची प्रतीक्षा बेळगाव : दसऱ्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *