Friday , October 23 2026
Breaking News

शिवांगी राहुल मोदगेकर यांना ‘बेला टिचर्स अवॉर्ड’ने सन्मानित

Spread the love

 

बेळगाव : बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी बेनकनहल्ली बेळगाव येथील माध्यमिक हिंदी विषय शिक्षिका शिवांगी राहुल मोदगेकर यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, उत्कृष्ट समर्पण आणि विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी केलेल्या सातत्यपूर्ण योगदानाबद्दल ‘बेला टिचर्स अवॉर्ड – आजीवन शैक्षणिक योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या अनेक अर्जांमधून शिवांगी राहुल मोदगेकर यांची त्यांच्या शैक्षणिक कार्याची, समर्पणाची आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन निवड करण्यात आली.
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते श्री. सुदेश बेरी यांच्या हस्ते त्यांना हा प्रतिष्ठित ‘आजीवन शैक्षणिक योगदान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, संस्कार आणि विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी शिवांगी मोदगेकर
सातत्याने प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे असलेले समर्पण आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती यामुळे त्यांची शैक्षणिक क्षेत्रात विशेष ओळख निर्माण झाली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी तसेच सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

रविवारची सुट्टी विसरा! १ नोव्हेंबरला शाळांमध्ये राज्योत्सव अनिवार्य

Spread the love  सरकारी, अनुदानित व विनाअनुदानित शाळांसाठी शिक्षण खात्याचे आदेश; मुख्याध्यापकांना आयोजनाच्या सूचना बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *