Friday , October 23 2026
Breaking News

भाग्यनगर परिसरातून १० मेंढ्यांची चोरी; तिघे ताब्यात

Spread the love

 

स्विफ्ट कारसह ३.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त; टिळकवाडी पोलिसांची कारवाई

बेळगाव : भाग्यनगर परिसरातून तब्बल १० मेंढ्यांची चोरी केल्याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत चोरीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट कार आणि रोख रक्कम असा एकूण ३ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

भाग्यनगर परिसरातून १० मेंढ्या चोरीला गेल्याची तक्रार टिळकवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार गुन्हा क्रमांक ११०/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक परशुराम पूजारी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने चोरीचा छडा लावण्यासाठी तपास सुरू केला.

तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अशफाक खाजासाब साटी (४२, रा. तेंगिनकेरी गल्ली), मोहम्मद उबेद फयाज डोणी (१९, रा. तेंगिनकेरी गल्ली) आणि मोहम्मद कैफ अयुबखान मसरगुप्पी (२०, रा. बुकारी गल्ली, बेळगाव) या तिघांना ताब्यात घेतले.

आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट व्हीएक्सआय कार (क्र. KA-23-M-8448), अंदाजे २ लाख रुपये किमतीची, तसेच १ लाख १७ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख १७ हजार रुपये आहे.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, चोरीच्या घटनेचा पुढील तपास टिळकवाडी पोलीस करीत आहेत.

या कारवाईत पोलीस निरीक्षक परशुराम पूजारी, पीएसआय विश्वनाथ घंटामठ, पीएसआय अडिवेप्पा कुंडेद तसेच पोलीस कर्मचारी महेश पाटील, एस.एम. करलिंगण्णवर, लाडजिसाब मुल्तानी, नागेंद्र तळवार, परमानंद पवार आणि गंगा पार्वती यांनी सहभाग घेतला.

About Belgaum Varta

Check Also

शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके आणि मनोहर हुंदरे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *