Tuesday , October 6 2026
Breaking News

‘शिक्षणातून माणूस घडला पाहिजे’ : प्रा. सुरेश पाटील

Spread the love

 

बेळगाव : “शिक्षणातून माणूस घडला पाहिजे, असे शिक्षण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिले पाहिजे. भाषा विषयाच्या शिक्षकांनी केवळ विषय शिकवून चालणार नाही, तर विद्यार्थ्यांना संस्कार आणि संस्कृतीही शिकविली पाहिजे,” असे प्रतिपादन प्रा. सुरेश पाटील यांनी केले.
छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव (साप्ताहिक राष्ट्रवीर) आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विषय शिक्षकांसाठी आयोजित कार्यशाळेच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाच्या सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी हसनेकर यांनी प्रास्ताविक करून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. राष्ट्रवीर साप्ताहिकाचे व्यवस्थापक शंकर केंगाळकर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर किशोर पाटील यांनी प्रमुख पाहुण्या व विषयतज्ज्ञ कल्पना रायजाधव यांचा परिचय करून दिला. प्रा. सुरेश पाटील यांनी ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन कल्पना रायजाधव यांचे स्वागत केले. तसेच जी. जी. पाटील व पी. डी. पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यशाळेत कल्पना रायजाधव यांनी मराठी विषयाचे अध्यापन अधिक प्रभावीपणे कसे करावे, विद्यार्थ्यांमध्ये भाषेची आवड कशी निर्माण करावी तसेच शिक्षकाची भूमिका काय असावी, याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाला शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी हसनेकर यांनी केले तर मारुती कंग्राळकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यशाळेस मराठी विषयाचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्यावतीने मराठीतेतर विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा कार्यशाळेचे आयोजन

Spread the love  बेळगाव : सीमाभागात मराठी भाषेचे जतन व्हावे या दृष्टिकोनातून, इंग्रजी, कन्नड आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *