येळ्ळूर : श्रावण मासाच्या पवित्र पर्वानिमित्त येळ्ळूर ग्रामदेवता श्री चांगळेश्वरी देवीचा वार्षिक अभिषेक सोहळा मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत भक्तिमय, मंगलमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. श्री चांगळेश्वरी अभिषेक मंडळ व श्री चांगळेश्वरी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या २४ वर्षांपासून ही धार्मिक परंपरा अखंडपणे जपली जात …
Read More »आनंदनगर रहिवासी संघटनेतर्फे नगरसेविका सारिका पाटील यांचा सत्कार
बेळगाव : नगरसेविका सौ. सारिका पाटील यांची बेळगांव महापालिकेच्या लेखा समितीच्या अध्यक्षस्थानी निवड झाल्याबद्दल संघटनेतर्फे शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष आप्पाजी कुगजी हे तर शिवमंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद रेवणकर व उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शुभांगी पाटील ह्या …
Read More »बिदर जिल्हा म. ए. समितीची आज महत्त्वपूर्ण बैठक
बिदर : शासकीय व अशासकीय कार्यालयांवर मराठी भाषेतील फलक लावणे तसेच मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे मंजूर करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी, बिदर यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यासंदर्भात बिदर जिल्ह्यातील मराठी भाषिक बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आज, बुधवार (दि. २६ ऑगस्ट) रोजी आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती, बिदरचे अध्यक्ष रामराव …
Read More »डूडलीफाय घेऊन आले मुलांच्या कल्पकतेला रंग देणारी आनंदाची पर्वणी
मुलांच्या कृतीशीलतेला वाव मिळावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला नवी दिशा मिळावी आणि त्यांच्या कल्पना प्रत्यक्ष कलाकृतीच्या माध्यमातून साकार व्हाव्यात, या उद्देशाने डूडलीफाय (Doodlify) मुलांसाठी आगळावेगळा कलात्मक अनुभव घेऊन आले आहे. विविध आकर्षक रेखाचित्रांना रंग आणि कल्पकतेची जोड देत मुलांच्या क्राफ्ट, पेंट आणि इमॅजिन या सर्जनशील प्रवृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न डूडलीफायच्या माध्यमातून …
Read More »बेळगाव केन्द्राला राष्ट्रीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांक
बेळगाव (प्रतिनिधी) : बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली मध्यवर्ती संघटना व मराठी प्रतिष्ठान बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगलोर येथील महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात राष्ट्रीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस समारंभात बेळगाव केन्द्राला द्वितीय क्रमांकाच्या बक्षिसाने गौरवण्यात आले. बेंगलोर येथे रविवारी पार पडलेल्या बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संजीव केसकर व श्री. …
Read More »BEACON जिल्हा सदस्यत्व सेमिनार बेळगाव येथे यशस्वीपणे संपन्न
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे “BEACON – जिल्हा सदस्यत्व सेमिनार २०२६–२७” चे आयोजन २३ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. एच. बी. राजशेखर हॉल, जेएनएमसी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगाव येथे यशस्वीपणे करण्यात आले. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० मधील सुमारे २४५ रोटेरियन्सनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रोटरी सदस्यत्व बळकट करणे, अधिक सक्षम …
Read More »शेळ्या चोरीच्या तीन घटनांचा उलगडा; दोघे अटकेत
बेळगाव : जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या शेळ्या चोरीच्या घटनांचा पोलिसांनी छडा लावत दोघांना अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे १.५० लाख रुपयांहून अधिक किमतीच्या सात शेळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली कार आणि दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे लक्ष्मण कणबर्गी …
Read More »केसरेकर दाम्पत्य दुहेरी हत्याकांड; आरोपीला कठोर शिक्षा, अनाथ मुलांना शासकीय मदतीची मागणी
बेळगाव : सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्य दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, तसेच पालक गमावलेल्या दोन्ही मुलांना शासकीय मदत, शिक्षणाची जबाबदारी आणि कायदेशीर संरक्षण मिळावे, अशी मागणी समस्त मराठा समाज बेळगावच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांकडे केली. यासंदर्भात शिष्टमंडळाने मुंबईत उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे भेट
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, कॅम्प, बेळगाव येथे शालेय प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संदेश देत शेतकऱ्यांना फळझाडांची रोपे भेट दिली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम, वृक्षसंवर्धन, कृषीविषयक जाणीव आणि सामाजिक जबाबदारीची भावना रुजविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. …
Read More »आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती
बेळगाव : राज्य सरकारने बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांची बेळगाव शहरी विकास प्राधिकरणाच्या (बुडा) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मंत्रीपदाच्या चर्चेत असलेल्या सेठ यांच्यावर सरकारने आता महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. बुडाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या जागी आसिफ सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या सचिव लता के. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta