Friday , October 23 2026
Breaking News

मच्छेतील तरुण वकिलाचा आकस्मिक मृत्यू

Spread the love

 

बेळगाव ग्रामीण पोलिसांत संशयास्पद मृत्यूची नोंद

बेळगाव : तालुक्यातील मच्छे येथील ३८ वर्षीय तरुण वकिलाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. राकेश कृष्णा कलखांबकर (वय ३८, रा. मच्छे) असे मृत वकिलाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मंगळवारी (६ ऑक्टोबर) रात्री राकेश हे मित्रांसोबत जेवणासाठी बाहेर गेले होते. जेवण आटोपून घरी परतल्यानंतर ते नेहमीप्रमाणे झोपी गेले. बुधवारी सकाळी त्यांच्या पत्नीने त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

यानंतर त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *