Friday , October 23 2026
Breaking News

नागुर्डा-वाडा येथील नागेश देव महारुद्र मंदिरात चोरी

Spread the love

 

 

दानपेटीतील रोकड लंपास; सीसीटीव्हीची हार्ड डिस्कही चोरट्यांनी नेली

खानापूर : नागुर्डा-वाडा येथील नागेश देव महारुद्र मंदिरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून दानपेटीतील रोकड लंपास केली. एवढेच नव्हे, तर चोरीचा मागमूस लागू नये यासाठी मंदिरातील सीसीटीव्ही यंत्रणेची हार्ड डिस्कही चोरून नेली. बुधवारी रात्री घडलेली ही घटना गुरुवारी सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.

अवघ्या पाच महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या या मंदिराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. गावाबाहेरील निर्जन परिसराचा फायदा घेत चोरट्यांनी दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम लंपास केली. मात्र, गाभाऱ्यात प्रवेश न केल्याने देवाची मूर्ती आणि दागिने सुरक्षित राहिले.

चोरीनंतर चोरट्यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची हार्ड डिस्कही सोबत नेल्याने तपासात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे चोरट्यांचा माग काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान, खानापूर तालुक्यातील मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढत असल्याने भाविक व ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मंदिर परिसरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, तसेच नागुर्डा-वाडा मंदिरातील चोरीचा तातडीने तपास करून आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता. पं. निवडणुका

Spread the love  जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन खानापूर : जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *