


गोवा : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, गोव्यातील डोना पाउला येथील निवासस्थानी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नाना पाटेकर यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयाने, प्रभावी संवादफेकीने आणि विविधांगी भूमिकांनी त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतंत्र ठसा उमटवला होता.
‘क्रांतिवीर’, ‘परिंदा’, ‘प्रहार’, ‘खामोशी’, ‘अपहरण’, ‘अब तक छप्पन’ यांसह ‘वेलकम’सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून त्यांची ओळख होती.
नाना पाटेकर यांच्या निधनाची अधिकृत माहिती आणि त्यांच्या अंत्यसंस्काराबाबतचे तपशील समोर आल्यानंतर बातमी अपडेट करण्यात येईल.

Belgaum Varta Belgaum Varta