


चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांची बैठक
निपाणी (वार्ता) : देशातील प्रत्येकाला मूलभूत मतदानाचा हक्क मिळवण्या साठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली व्यापक लढा सुरू आहे. एसआयआरच्या नावाखाली भाजपा देशातील लोकशाहीच्या मूळावर उठत आहे. त्यांचे हे षडयंत्र हाणून पाडणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. त्यासाठी सर्वांनी जागृत राहून एसआयआर प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीतील आपल्या नावाची शहानिशा करावी. जीएलए २ नी सक्रीय राहून याबाबात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी केले. निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात बुधवारी (ता.७) सायंकाळी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, देशामध्ये भाजपाचे लोक शाहीच्या विरोधात काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमिवर लोकशाहीचे रक्षण करून घटनेची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासह प्रत्येकाला मताचा अधिकार मिळण्यासाठी इंडिया आघाडीचा लढा सुरू आहे. देशविरोधी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षानी एकत्र येवून काळाची गरज म्हणून लढा सुरू केला आहे. एसआयआरमधून कमी केलेल्या मतदारांना पुन्हा सामावून घेणे, निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा राजीनामा या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. राहुल गांधींच्या विरोधी पक्षनेत्यांशी निंदनीय वर्तणूक करत पोलीस बळाचा गैरवापर करण्यात आला. हे निषेधार्ह आहे.
सध्या भाजपाने आपणाला नको अशा मतदारांना वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७ स्वताच्या कार्यालयातून वाटल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांचे हे पडयंत्र हाणून पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग रहावे. जीएलए २ नी अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून चौकशी करावी. तहसिलदारांकडेही याबाबत विचारणा करावी, जेणेकरून फॉर्म क्र. ७ चा दुरूपयोग होणार नाही, असे आवाहनही लक्ष्मणराव लक्ष्मणराव चिंगळे यावेळी केले.
यावेळी अस्लम शिकलगार, अॅड. सूर्याजी पोटले, अॅड. संजय चव्हाण, किरण पाटोळे, दिपक सावंत, जावेद कोल्हापूरे, जरारखान पठाण, भालचंद्र वाडकर, किरण पाटले, सुमित चव्हाण, किरण पाटोळे, अमोल साबळे, लोकेश घस्ते यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थिती होते.

Belgaum Varta Belgaum Varta