Friday , October 23 2026
Breaking News

ऑनलाइन फसवणुकीत दाम्पत्याला २.२३ लाखांचा गंडा

Spread the love

 

 

विविध बँक खात्यांत परस्पर रक्कम वर्ग; जिल्हा सीईएन पोलिसांत तक्रार

रामदुर्ग : ऑनलाइन फसवणुकीचा फंडा वापरून नागरिकांच्या बँक खात्यातील रक्कम लंपास करण्याचे प्रकार सातत्याने सुरू असतानाच रामदुर्ग तालुक्यातील दाम्पत्याला भामट्यांनी तब्बल २ लाख २३ हजार ७५३ रुपयांचा गंडा घातला. दाम्पत्याच्या विविध बँक खात्यांतून ही रक्कम परस्पर वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाइन पद्धतीने वर्ग करण्यात आली. याप्रकरणी शेषाप्पा धुंडाप्पा पोटरेड्डी (वय ५८, रा. कमकेरी, ता. रामदुर्ग) यांनी सोमवार, दि. ५ रोजी जिल्हा सीईएन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

शेषाप्पा पोटरेड्डी यांचे कमकेरी येथील बँक ऑफ इंडिया तसेच मुधोळ येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) येथे खाते आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावरही बँक ऑफ इंडियामध्ये खाते आहे. या तिन्ही बँक खात्यांना मोबाईल क्रमांक लिंक करण्यात आले आहेत. याशिवाय आणखी एका मोबाईल क्रमांकावर यूपीआय, पेटीएम तसेच फोनपेचा वापर केला जात होता.

दि. १६ ते १२ सप्टेंबरदरम्यान दाम्पत्याच्या बँक खात्यांतून भामट्यांनी ऑनलाइन व्यवहार करत तब्बल २ लाख २३ हजार ७५३ रुपये परस्पर विविध बँक खात्यांमध्ये वर्ग केले. खात्यातील रक्कम कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे पोटरेड्डी यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ जिल्हा सीईएन पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, रक्कम कोणत्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली आणि या फसवणुकीमागे कोण आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *