


बेळगाव : एसआयआरअंतर्गत नवीन मतदार यादी उपलब्ध झाली असून, मराठी भाषेतही ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. बेळगाव शहरासह परिसरातील नागरिकांनी आपल्या मतदारसंघातील संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, याची तातडीने पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
नवीन मतदार यादीच्या प्रक्रियेमुळे नागरिकांनी आपल्या नावाची नोंद तपासणे महत्त्वाचे आहे. मतदार यादीत नाव आहे की नाही, तसेच नावासोबतचा पत्ता व अन्य तपशील योग्य आहेत का, याचीही खात्री करून घ्यावी. नाव वगळले गेले असल्यास किंवा तपशिलात काही त्रुटी आढळल्यास संबंधित यंत्रणेकडे त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी.
बेळगाव शहर आणि परिसरातील नागरिकांनी मतदानाचा अधिकार अबाधित राहण्यासाठी मतदार यादीची स्वतः पडताळणी करून घेण्याबरोबरच आपल्या कुटुंबातील सदस्यांची नावेही तपासावीत, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta