राज्यस्तरावर प्रथम क्रमांक; आता चेन्नईच्या दिशेने कूच बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारत विकास परिषद आयोजित सिंधनूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. हिंदी गायन, संस्कृत गायन आणि लोकगीत गायन या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून विद्यार्थ्यांनी शाळेच्या …
Read More »मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
वेटलिफ्टिंग, कुस्ती, जलतरण आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्ये खेळाडूंची चमकदार कामगिरी बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंग, कुस्ती, जलतरण आणि बुद्धिबळ या विविध क्रीडा प्रकारांत यश मिळवत शाळेच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. वेटलिफ्टिंगमध्ये कैवल्य घोरपडे …
Read More »समाज शिक्षण संस्थेची ४१वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात
येळ्ळूर : येथील समाज शिक्षण संस्थेची ४१वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या अध्यक्षा लीलाताई मेणसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी संस्थेचे संचालक पुंडलिक मेणसे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संस्थेचे सेक्रेटरी जीवन घाडी यांनी लेखापरीक्षण अहवाल तसेच मागील वर्षाचा जमाखर्चाचा अहवाल सादर केला. यावेळी हणमंत पाटील आणि …
Read More »बेळगाव जिल्हा पंचायत आरक्षण जाहीर; १९ ऑक्टोबरपर्यंत हरकतींची मुदत
९० मतदारसंघांतील आरक्षण निश्चित; इच्छुक उमेदवारांचे राजकीय गणित बदलणार बेळगाव : बेळगाव जिल्हा पंचायत निवडणुकीच्या हालचालींना वेग येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कर्नाटक सरकारच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाने जिल्ह्यातील ९० जिल्हा पंचायत प्रादेशिक मतदारसंघांच्या आरक्षणाचा मसुदा जाहीर केला आहे. ९ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रानुसार, विविध प्रवर्गांसाठी …
Read More »रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांची नाना पाटेकर यांना रांगोळीतून श्रद्धांजली; आठ तासांत साकारले चित्र
बेळगाव : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असताना, बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. एक चित्रकार ते नटसम्राट असा प्रवास करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांचे व्यक्तिमत्त्व अजित औरवाडकर यांनी कृष्णधवल रांगोळीतून साकारले आहे. …
Read More »एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रमाकांत कोंडुस्कर यांचा पाठिंबा
रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह कार्यकर्त्यांची आंदोलनकर्त्यांना भेट; रोहित पवारांचा घोंगडी देऊन सत्कार पुणे : विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सीमाभागातील कार्यकर्त्यांनी भेट देत पाठिंबा व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सीमाभागातील नागरिक आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांनी दिला. या भेटीदरम्यान बेळगावची खास …
Read More »भरतेश शाळेत पालकांसाठी अॅनिमिया व दंत आरोग्य तपासणी शिबिर
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण, हॅपी हार्ट फाउंडेशन आणि इंडियन डेंटल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भरतेश कन्नड माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी अॅनिमिया तपासणी व दंत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराचा मुख्य उद्देश प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेबाबत जागरूकता निर्माण करणे, अॅनिमियाचे वेळेत निदान करणे तसेच तोंडाची स्वच्छता …
Read More »सौंदत्ती श्री यल्लामा देवीच्या उत्सवासाठी बेळगावहून जादा बसेस!
बेळगाव : सौंदत्ती येथील श्री यल्लामा देवीचा वार्षिक उत्सव १० ते २१ ऑक्टोबरदरम्यान होणार असून, रविवार, ११ ऑक्टोबर ते सोमवार, १९ ऑक्टोबर हा उत्सवाचा प्रमुख कालावधी असणार आहे. या काळात देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने बेळगावहून सौंदत्तीसाठी जादा बसेसची व्यवस्था केली …
Read More »माळमारुती पोलिसांची मटका अड्ड्यावर धाड; एकाला अटक
बेळगाव : माळमारुती पोलिसांनी सागर कॉलनी परिसरातील सिद्धेश्वर डोंगराजवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा टाकून एका संशयिताला ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रकमेसह मोबाईल आणि मटका चिठ्ठ्या असा एकूण २० हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी माळमारुती पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुलगेरी यांना …
Read More »पावसाने दडी मारल्याने पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव; शेतकरी चिंतेत, नुकसानभरपाईसह कर्जमाफीची मागणी
बेळगाव : येळ्ळूर, शहापूर, वडगाव, अनगोळसह परिसरातील काही भागांत यंदा बासमती, इंद्रायणी, सोनम, शुभांगी, सुपर सोनम, एमपी आणि दप्तरी यांसह विविध जातींच्या भातपिकांची लागवड करण्यात आली आहे. ही पिके कापणीच्या टप्प्यावर आली असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाला …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta