Friday , October 23 2026
Breaking News

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रमाकांत कोंडुस्कर यांचा पाठिंबा

Spread the love

 

रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह कार्यकर्त्यांची आंदोलनकर्त्यांना भेट; रोहित पवारांचा घोंगडी देऊन सत्कार

पुणे : विविध मागण्यांसाठी पुण्यात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना सीमाभागातील कार्यकर्त्यांनी भेट देत पाठिंबा व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सीमाभागातील नागरिक आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांनी दिला.

या भेटीदरम्यान बेळगावची खास ओळख असलेली भाकर-चटणी आणि प्रसिद्ध कुंदा आंदोलक विद्यार्थी विवेकानंद पाटील यांना भरवण्यात आला. या माध्यमातून सीमाभागातील कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांप्रती आपुलकी व्यक्त करत त्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठबळ दिले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे आमदार रोहित पवार यांचा सीमाभागातील कार्यकर्त्यांच्या वतीने पारंपरिक घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि आंदोलनावर योग्य तोडगा काढावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सीमाभागातील कार्यकर्त्यांनी दिलेल्या या भावनिक पाठिंब्यामुळे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्यास मदत झाली.

यावेळी रमाकांत कोंडुस्कर यांच्यासमवेत अमित देसाई, राजेंद्र बैलूर, विनोद बिर्जे, दिनेश जगताप, अजय सावंत, मंदार पाबळ, रईस बागवान आणि प्रणय पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *