Friday , October 23 2026
Breaking News

मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Spread the love

 

वेटलिफ्टिंग, कुस्ती, जलतरण आणि बुद्धिबळ स्पर्धांमध्ये खेळाडूंची चमकदार कामगिरी

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये मराठी विद्यानिकेतनच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वेटलिफ्टिंग, कुस्ती, जलतरण आणि बुद्धिबळ या विविध क्रीडा प्रकारांत यश मिळवत शाळेच्या खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे.

वेटलिफ्टिंगमध्ये कैवल्य घोरपडे (९५ किलो), बालाजी पाटील (५६ किलो), समीक्षा हिरोजी (४८ किलो) आणि कलाश्री बागेवाडी (५३ किलो) यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडे याची ५०, १०० आणि २०० मीटर बटरफ्लाय तसेच ४×१०० मीटर फ्रीस्टाइल रिले आणि ४×१०० मीटर मेडले रिले या प्रकारांसाठी निवड झाली आहे. वेदांत तरळे याची ५०, १०० आणि २०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारांत निवड झाली आहे.

कुस्तीमध्ये बालाजी पाटील (५१ किलो) याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. तसेच बुद्धिबळ स्पर्धेत तन्मयी पावले आणि रितेश मुचंडीकर यांचीही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या सर्व खेळाडूंना माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एन. सी. उडकेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, शिक्षण संयोजिका नीला आपटे, शिक्षक समन्वयक सविता पवार, क्रीडा शिक्षक महेश हगीदळे, दत्ता पाटील, वैभवी दळवी आणि प्रशिक्षक श्रीधर बेन्नाळकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

खेळाडूंच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, राज्यस्तरीय स्पर्धेतही ते उल्लेखनीय कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *