


राज्यस्तरावर प्रथम क्रमांक; आता चेन्नईच्या दिशेने कूच
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी भारत विकास परिषद आयोजित सिंधनूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय गायन स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. हिंदी गायन, संस्कृत गायन आणि लोकगीत गायन या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावून विद्यार्थ्यांनी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या उल्लेखनीय यशामुळे विद्यार्थ्यांची चेन्नई येथे होणाऱ्या दक्षिण भारत प्रादेशिक गायन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या सांस्कृतिक क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. प्रदीप पाटील यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संगीत शिक्षिका सौ. अक्षता मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्री. आर. के. पाटील, उपाध्यक्ष प्रो. श्री. आर. एस. पाटील, सचिव प्रो. श्री. नितीन घोरपडे, प्राचार्य श्री. प्रदीप पाटील, उपप्राचार्य श्री. मनोहर करडी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या मार्गदर्शिकेचे अभिनंदन केले व आगामी दक्षिण भारत प्रादेशिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ज्योती सेंट्रल स्कूलच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, चेन्नई येथे होणाऱ्या स्पर्धेतही विद्यार्थी यशाची परंपरा कायम राखतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Belgaum Varta Belgaum Varta