Friday , October 23 2026
Breaking News

खानापूर तालुका काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन

Spread the love

 

झेडपी-टीपी निवडणुकीसाठी आठ दिवसांची मुदत; डॉ. अंजली निंबाळकर यांच्या सूचनेनुसार प्रक्रिया सुरू

खानापूर : जिल्हा पंचायत (झेडपी) आणि तालुका पंचायत (टीपी) निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर खानापूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

खानापूरच्या माजी आमदार तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या (एआयसीसी) सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्या सूचनेनुसार हे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, महिला आणि युवकांपैकी झेडपी किंवा टीपी निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांकडे आपले अर्ज सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्जामध्ये आपले पूर्ण नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा. तसेच कोणत्या जिल्हा पंचायत किंवा तालुका पंचायत मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, त्याचा स्पष्ट उल्लेख करावा. यासोबत स्वतःचा थोडक्यात परिचय आणि बायोडाटा जोडणे आवश्यक आहे.

आठ दिवसांत अर्ज जमा करण्याचे आवाहन

सर्व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक माहितीसह अर्ज आठ दिवसांच्या आत ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांकडे जमा करावेत, असे डॉ. अंजली निंबाळकर यांनी सूचित केले आहे.

आरक्षण जाहीर झाल्यानंतर काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने खानापूर तालुक्यात आगामी जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत निवडणुकांच्या तयारीला वेग येण्याची शक्यता आहे. अर्जांच्या माध्यमातून इच्छुकांची माहिती घेऊन उमेदवारीबाबत पुढील निर्णय घेण्याच्या दृष्टीने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता. पं. निवडणुका

Spread the love  जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन खानापूर : जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *