Friday , October 23 2026
Breaking News

शुभम शेळके यांना हद्दपार करा; कर्नाटक रक्षण वेदिकेची मागणी

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते शुभम शेळके यांच्याविरोधात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवरामेगौडा गटाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शेळके यांना तातडीने बेळगाव जिल्ह्यातून हद्दपार करावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.

या मागणीसाठी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील ऐतिहासिक राणी चन्नम्मा चौकात आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी शुभम शेळके यांच्या छायाचित्राचे दहन करून निषेध व्यक्त केला. आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष वाजिद हिरे यांनी केले.

जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तसेच कन्नड भूमी आणि जलासंदर्भात कथित आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकावे आणि जिल्ह्यातून हद्दपार करावे, अशी मागणी हिरेकुडी यांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांकडे केली.

सोशल मीडिया किंवा सार्वजनिक व्यासपीठांवर जिल्हाधिकाऱ्यांचे नाव घेऊन शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास संघटना गप्प बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी शुभम शेळके बेळगावमध्ये जिथे दिसतील, तिथे त्यांना धडा शिकवू, अशी आक्रमक भाषाही आंदोलकांनी वापरली.

या आंदोलनात कर्नाटक रक्षण वेदिकेचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *