Friday , October 23 2026
Breaking News

बेळगावच्या सह्याद्रीनगरात घराला आग; दोन मुले सुखरूप

Spread the love

 

 

घरमालक श्रीदेवी जोशी यांनी दाखवली प्रसंगावधान

बेळगाव : शहरातील सह्याद्रीनगर परिसरात शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत घरात असलेली दोन मुले सुदैवाने सुखरूप बचावली. घरमालक श्रीदेवी जोशी यांनी मुलांच्या आक्रोशाचा आवाज ऐकताच धाव घेत त्यांना धुराने भरलेल्या घरातून सुरक्षित बाहेर काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीदेवी जोशी यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर रूपा नाशिपुडी या आपल्या दोन मुलांसह भाड्याने राहतात. अमावस्येनिमित्त रूपा या घराला कुलूप लावून मंदिरात गेल्या होत्या. त्यावेळी घरात असलेल्या मुलांच्या आसपास अचानक धूर पसरू लागला आणि आग लागल्याने त्यांनी आरडाओरड सुरू केली.

मुलांचा आवाज ऐकताच श्रीदेवी जोशी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. प्रसंगावधान राखत त्यांनी दोन्ही मुलांना सुरक्षितपणे घराबाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. मुलांना सुखरूप वाचविल्याबद्दल त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.

या घटनेची नोंद बेळगाव एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *