Sunday , September 20 2026
Breaking News

बेळगाव

बेळगावसह खानापूर तालुक्यात उद्या ‘पॉवर कट’!

  हेस्कॉमच्या दुरुस्ती कामाचा फटका; बेळगावसह खानापूर तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा ठप्प बेळगाव : हेस्कॉमच्या दुरुस्ती कामामुळे मागील आठवड्यात बेळगाव शहर अंधारात गेले होते. आता दुरुस्तीच्या कामांचा मोर्चा ग्रामीण भागाकडे वळला असून, रविवारी (३० ऑगस्ट) बेळगाव व खानापूर तालुक्यातील अनेक गावांचा वीजपुरवठा तब्बल सात ते आठ तास बंद राहणार आहे. …

Read More »

मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेला २ कोटी ८८ लाखांचा निव्वळ नफा

  बेळगाव : मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय आर्थिक कामगिरी करत २ कोटी ८८ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. बँकेचे चेअरमन बाळाराम पाटील व संचालक मंडळाने ही माहिती दिली. बँकेची ८४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता बेळगाव येथील …

Read More »

श्री राम कॉलनी आदर्श रहिवासी संघटनेचा सहावा वर्धापनदिन विविध उपक्रमांनी उत्साहात

  बेळगाव : श्री राम कॉलनी आदर्श रहिवासी संघटनेचा सहावा वर्धापनदिन विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि समाजोपयोगी उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी गंगा नारायण सभागृहात आयोजित कार्यक्रमाला रहिवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संघटनेचे अध्यक्ष बाबुराव घोरपडे, माजी महापौर मंगेश पवार, कार्याध्यक्ष डॉ. मुरुगेन्द पटृनशेटी, सेक्रेटरी सुधीर …

Read More »

२१व्या मराठा युवक संघाच्या आंतरराज्य शालेय जलतरण स्पर्धांना आजपासून सुरुवात

  बेळगाव : मराठा युवक संघ आणि आबा हिंद स्पोर्ट्स क्लबच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या २१व्या भव्य आंतरशालेय तसेच आंतरमहाविद्यालयीन आंतरराज्य जलतरण स्पर्धांना आज, शनिवार दि. २९ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. महानगरपालिकेच्या गोवावेस येथील जलतरण तलावात दुपारी २ वाजल्यापासून स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन सायंकाळी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते …

Read More »

बाग परिवाराचा ऑगस्ट महिन्याचा कार्यक्रम उत्साहात

  बेळगाव : बाग परिवाराचा ऑगस्ट महिन्याचा कार्यक्रम नुकताच जत्ती मठ येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात कवी-कवयित्रींनी विविध विषयांवरील आशयघन कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. कार्यक्रमात अशोक सुतार यांनी ‘का कशासाठी’, किरण पाटील यांनी ‘आई सोडून तुला …

Read More »

पोस्को प्रकरणातील तरुणाला अखेर नियमित जामीन; ३ महिने २६ दिवसांनंतर न्यायालयाचा दिलासा

  बेळगाव : खानापूर तालुक्यातील चर्चेत असलेल्या पोस्को प्रकरणात गेल्या सुमारे तीन महिने २६ दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या तरुणाला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष पोस्को न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश न्यायालयाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी दिला. प्रकरणातील माहितीनुसार, संबंधित तरुण व अल्पवयीन मुलगी यांच्यात प्रेमसंबंध …

Read More »

इस्कॉनतर्फे शुक्रवारी बलराम जयंती साजरी

  बेळगाव : “भगवान श्रीकृष्ण यांची अनेक विस्तारित रूपे आहेत त्यामध्ये भगवान बलराम हे भगवान श्रीकृष्णांचे पहिले विस्तारित रूप आहे. म्हणूनच भगवान बलराम यांचा जन्म श्रीकृष्णांच्या अगोदर रोहिणी मातेच्या गर्भातून झाला” असे विचार इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष परमपूज्य भक्तीरसामृत स्वामी महाराज यांनी बोलताना व्यक्त केले. भगवान बलराम यांचा प्राकट्य दिवस हा …

Read More »

राष्ट्रीय क्रीडा दिन निमित्ताने आयोजित हॉकी स्पर्धांचा उद्या बक्षीस समारंभ

  बेळगाव : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यालय व आंतरशालेय हॉकी स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत मुलांच्या संघातून विश्वेश्वरय्या महाविद्यालय विरुद्ध आरपीडी व मुलींच्या संघातून आरपीडी विरुद्ध मूडलगी महाविद्यालय तसेच आंतरशालेय गटातून ताराराणी विरुद्ध भंडारी स्कूल त्यांतील हे अंतिम स्पर्धेत पोहोचले आहेत. अंतिम सामने आज दिनांक 29 रोजी …

Read More »

अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व शपथविधी सोहळा शनिवारी

  बेळगाव : सामाजिक सेवा, मैत्री आणि जागतिक एकात्मतेचा संदेश घेऊन कार्यरत असलेल्या असोसिएशन ऑफ अलायन्स क्लब्स इंटरनॅशनल अंतर्गत अलायन्स क्लब ऑफ वेणुग्राम या नव्या क्लबचा उद्घाटन व पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा शनिवार, दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजता हॉटेल सीरॉक कॉलेज रोड मध्ये संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास …

Read More »

मराठा रेजिमेंटमध्ये रंगला रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा

  बेळगाव : बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर (मराठा एलआयआरसी) येथे पारंपरिक पद्धतीने आपुलकीच्या वातावरणात रक्षाबंधनाचा स्नेहसोहळा साजरा करण्यात आला.या सोहळ्याला मराठा एलआयआरसीचे कमांडंट, ब्रिगेडियर गिरीश उपाध्याय, एसएम, व्हीएसएम, फॅमिली वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा श्रीमती वेदा उपाध्याय, तसेच सर्व अधिकारी त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी …

Read More »