Friday , October 23 2026
Breaking News

बेळगावात पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई; ४० हून अधिक क्लब, पब व हॉटेल्सवर छापे

Spread the love

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही क्लब-पबवर कारवाई; अल्पवयीनांच्या प्रवेशावर पोलिसांचे लक्ष

बेळगाव : शहरात नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या क्लब, पब, हॉटेल्स आणि ढाब्यांविरोधात बेळगाव शहर पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबवली. पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी ४० हून अधिक ठिकाणी छापे टाकून तपासणी करण्यात आली.

या कारवाईदरम्यान काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून क्लब व पब सुरू असल्याचे आढळून आले. तसेच, मोठ्या आवाजात कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणांनाही पोलिसांनी इशारा दिला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही क्लब व पबना बंद करण्याचे निर्देश देण्यात आले.

काही ठिकाणी अल्पवयीन मुले आढळल्याने पोलिसांनी ओळखपत्रांची तपासणी केली. अल्पवयीनांना प्रवेश दिला जाऊ नये, यासाठी संबंधित आस्थापनांना सूचना देण्यात आल्या. नियम मोडणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी स्पष्ट केले.

रात्री ११ नंतर आस्थापने बंद करण्याचे निर्देश

नियमानुसार रात्री ११ वाजल्यानंतर सर्व क्लब, पब आणि संबंधित आस्थापने बंद ठेवण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. आगामी दांडिया कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यासह साध्या वेशातील पोलिसांची नियुक्ती करून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *