


बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि सार्वजनिक वाचनालय, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दि. १४ ऑक्टोबर २०१६ रोजी सायंकाळी ५-३० मराठा मंदिर, रेल्वे ओव्हर, ब्रिजजवळ, खानापूर रोड, गोवावेस, बेळगाव येथे
आयोजित करण्यात आलेला आहे. या सोहळ्यात यंदाचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार पद्मश्री डॉ. गणेश देवी, ज्येष्ठ साहित्यिक, ख्यातनाम भाषाशाखज्ञ आणि विचारवंत, धारवाड यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप रोख रुपये २५,०००/- मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे. यानिमित्त
पद्मश्री डॉ. गणेश देवी यांचा अल्पपरिचय
पद्मश्री डॉ. गणेश देवी हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे भारतीय साहित्य समीक्षक, भाषाशाखन आणि सांस्कृतिक कार्यकर्ते आहेत. भारतातील लुप्त होत चाललेल्या भाष्या आणि आदिवासी बोलीभाषांचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे.
डॉ. गणेश देवी यांचे उच्चशिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि लीइस विद्यापीठ (यूके) येथे झाले. त्यांनी १९८० ते १९९६ या काळात महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा येथे इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांनी लीइस आणि वेल सारख्या नामांकित विद्यापीठांमध्ये फेलोशिप देखील मिळविली आहे. त्यांचे सामाजिक आणि भाषिक कार्य सुध्दा मोठे आहे. त्यांनी भाषा संशोधन केंद्राची स्थापना करुन १९९६ मध्ये त्यांनी आदिवासी आणि भटक्या विमुक्त जमातींसाठी काम करण्यासाठी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला. त्यांनी बडोदा येथे भाषा संशोधन आणि प्रकाशन केंद्र आणि तेजगड येथे ‘आदिवासी अकादमी’ची स्थापना केली.
‘पीपल्स लिंग्विटिक सर्व्हे ऑफ इंडिया’ च्या नेतृत्वाखाली सुमारे ३ हजार स्वयंसेवकांच्या मदतीने भारतातील भाषांचा ऐतिहासिक आणि जगातील सर्वात मोठा सव्र्व्हे करण्यात आला. या माध्यमातून त्यांनी ७८० जियंत भाषांचे सर्वेक्षण, ५० बहुभाषिक खंडांमध्ये प्रकाशित केले. त्यांनी मराठी, गुजराती आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये विपुल लेखन केले असून त्यांची ९० पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
भारत सरकारने त्यांना साहित्यि आणि शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी सन २०१४ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले. त्यांच्या ‘आफ्टर अॅम्नीशिया’ या इंग्रजी समालोचनात्मक ग्रंथासाठी त्यांना सन १९९३ साली हा पुरस्कार मिळाला होता. मात्र, सन २०१५ मध्ये एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ त्यांनी हा पुरस्कार परत केला. असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
२०१६ मध्ये पंजाबमधील घुमान येथे झालेल्या बहुभाषिक पुमान साहित्यि संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. सध्या ते मुंबई येथील सोमैया विद्याविहार विद्यापीठात ‘स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन’चे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta