Friday , October 23 2026
Breaking News

झेडपी-टीपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर काँग्रेसची मंगळवारी बैठक

Spread the love

 

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांशी होणार चर्चा

खानापूर : जिल्हा पंचायत (झेडपी) आणि तालुका पंचायत (टीपी) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर यांनी खानापूर काँग्रेसची बैठक आयोजित केली आहे.

मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खानापूर येथील दुर्गानगरमधील रायगड निवासस्थानी ही बैठक होणार आहे.

या बैठकीत आगामी जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाची तयारी, निवडणुकीची रणनीती आणि पुढील नियोजन यासंदर्भात काँग्रेसचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, युवक व महिला प्रतिनिधींशी चर्चा करण्यात येणार आहे.

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यातील काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्त्यांनी बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. अंजलीताई निंबाळकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता. पं. निवडणुका

Spread the love  जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन खानापूर : जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *