


निपाणी (वार्ता) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या आमंत्रणावरून देशाचे ज्येष्ठ शेतकरी नेते आणि उत्तर प्रदेशचे व्ही.एन. सिंग यांचे येथील विश्रामगृहात स्वागत करण्यात आले.त्यानंर त्यांनी आंदोलन नगरातील तंबाखू दराच्या आंदोलनामधील हुतात्मा स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर देशपातळीवर आवाज उठवणारे व्ही. एन. सिंग यांची निपाणी भेट महत्त्वाची मानली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी हुतात्मा स्मारकाला भेट दिली व देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि सीमाभागातील आंदोलनात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.
यावेळी डॉ. अच्युत माने, प्राध्यापक एन. आय. खोत, गड्ड्यानावार भाऊसाहेब शिंगे, प्रा. आर. के. दिवाकर, मलगोंडा तावदारे, प्रा. आनंद संकपाळ, अनिल नेष्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta