Friday , October 23 2026
Breaking News

ट्रक-दुचाकी अपघातात सदलगा येथील वकीलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : दुचाकी आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात सदलगा येथील ॲड. अमोल भूपाल पाटील (वय ४४) यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे सदलगा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, की, अमोल पाटील हे कामानिमित्त इचलकरंजीला गेले होते. काम झाल्यानंतर इचलकरंजीहून गावाकडे येत असताना सायंकाळी बोरगाव येथे आल्यावर त्यांची दुचाकी व ट्रक यांच्यात अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला मार लागला. अपघाताची माहिती मिळताच अमोल यांच्या मित्र परिवारांनी त्यांना रुग्णवाहिकेतून सदलगा येतील प्राथमिक आरोग्य केंद्र उपचारासाठी हलवले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. चिक्कोडी येथे ते वकील म्हणून कार्यरत होते. सदलगा येथील आदर्श सोसायटीचे अध्यक्षही होते. रात्री उशिरानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बसगौडा नेर्ली करीत आहेत. अमोल यांच्या मागे आई, वडील भाऊ, पत्नी मुलगा असा परिवार आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *