Friday , November 6 2026
Breaking News

बेळगाव

विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धत दक्षिण मध्यक्षेत्राला दुहेरी मुकुट

  १४ व १७ वर्षांखालील गटांत दक्षिण मध्य क्षेत्राची बाजी; १९ वर्षांखालील गटात पश्चिम उत्तर प्रदेश विजेता बेळगाव : विद्याभारती कर्नाटक व दक्षिण मध्य क्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली विद्याभारती बेळगाव जिल्हा आणि संत मीरा इंग्रजी माध्यमिक स्कूल, अनगोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३७ व्या विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत दक्षिण मध्य क्षेत्राने …

Read More »

मराठी विद्यानिकेतनच्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये ३८ विद्यार्थ्यांनी घेतला विज्ञान-तंत्रज्ञानाचा अनुभव!

    कॅन्टोन्मेंट मराठी शाळा व भगतसिंग हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद बेळगाव : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि सर्जनशीलता विकसित व्हावी, तसेच त्यांना आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे, या उद्देशाने दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या मराठी विद्यानिकेतन हायस्कूल, बेळगाव येथील अटल टिंकरिंग लॅबच्या वतीने ५ ते …

Read More »

मतचोरीविरोधात शुक्रवारी बेळगांवात धरणे आंदोलन

  बेळगांव : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारातील अनियमितता व देशभरातील कोट्यवधी मतदारांची नावे वगळून त्यांचा राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे. याविरोधात देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून बेळगावात शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्य घटना बचाव समितीच्या सोमवारी झालेल्या बैठकीत …

Read More »

‘बेधडक शक्तिस्वरूप’ नवरात्र उत्सव मंडळ स्पर्धेच्या नावनोंदणीचा उद्या शेवटचा दिवस

  बेळगाव : बेधडक बेळगावच्या वतीने मध्यवर्ती नवरात्र उत्सव महामंडळ, बेळगाव यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘बेधडक शक्तिस्वरूप’ उत्कृष्ट नवरात्र उत्सव मंडळ स्पर्धा २०२६ साठी नावनोंदणी सुरू असून, नावनोंदणी करण्यासाठी १४ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बेळगाव शहर आणि तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांनी त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी …

Read More »

दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात महिषासुरमर्दिनी मूर्तीचे अनावरण

  स्वच्छता दूत आणि माळी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सोहळा बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता कपिलेश्वर मंदिरात दक्षिणकाशीच्या महिषासुरमर्दिनी मूर्तीचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला. गणेश विसर्जनाच्या काळात कपिलेश्वर मंदिर परिसरातील दोन्ही तलावांवर सलग तीन दिवस अहोरात्र …

Read More »

उद्याच्या शेतकरी आंदोलनाचा प्रशासनाला धसका, महामार्गाऐवजी ग्रामीण भागातून वाहतूक वळविणार

  बेळगाव : विविध शेतकरी संघटनांनी मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी आणि हिरेबागेवाडी टोल नाक्यांवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पोलिसांनी जड आणि हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत. जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग बेळगावच्या दिशेने येणाऱ्या जड वाहनांसाठी पुढील मार्गांचा …

Read More »

एसआयआर फॉर्म-७ प्रकरणात उच्च न्यायालयाची एफआयआरला स्थगिती; अनिल बेनके आक्रमक

  भाजप कार्यकर्त्यांवरील कारवाई राजकीय सूडबुद्धीतून केल्याचा आरोप; बूथस्तरीय कार्यकर्त्यांवर दबाव आणू नये, असा इशारा बेळगाव : एसआयआर (विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण) प्रक्रियेतील फॉर्म-७ प्रकरणावरून कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजप कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी दिली. काँग्रेस …

Read More »

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींसोबतची बैठक निष्फळ; ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उद्यापासून महामार्ग रोको आंदोलन

  ऊसाच्या एमएसपीमध्ये वाढ आणि साखर कारखाने तातडीने सुरू करण्याची मागणी बेळगाव : ऊसाला योग्य दर मिळावा, उसाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करावी आणि साखर कारखाने तातडीने सुरू करावेत, या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणताही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचा दावा शेतकरी …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे बैलहोंगल येथे २० लाभार्थ्यांना पोषण किटचे वितरण

  बैलहोंगल : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे आज तालुका आरोग्य कार्यालय, बैलहोंगल येथे पोषण किट वितरण उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत २० लाभार्थ्यांना पोषण किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एका महिन्यासाठी पुरेल असे पोषण किट देण्यात आले. हा उपक्रम सलग सहा महिने राबविण्याचे नियोजन असून, …

Read More »

भविष्यातील लेखक, कवी आणि नेतृत्व घडवण्यासाठी अशा स्पर्धा गरजेच्या : मालोजीराव अष्टेकर

  महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य वक्तृत्व स्पर्धा थाटात संपन्न बेळगाव : वक्तृत्व स्पर्धांमुळे भविष्यातील लेखक, कवी आणि नेतृत्व घडते. अशा स्पर्धा होणे ही काळाची गरज आहे. विजयी स्पर्धकांचे अभिनंदन आहेच, पण सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचेही खऱ्या अर्थाने कौतुक …

Read More »