Friday , October 23 2026
Breaking News

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे बैलहोंगल येथे २० लाभार्थ्यांना पोषण किटचे वितरण

Spread the love

 

बैलहोंगल : रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणतर्फे आज तालुका आरोग्य कार्यालय, बैलहोंगल येथे पोषण किट वितरण उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत २० लाभार्थ्यांना पोषण किटचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला एका महिन्यासाठी पुरेल असे पोषण किट देण्यात आले. हा उपक्रम सलग सहा महिने राबविण्याचे नियोजन असून, त्याद्वारे लाभार्थ्यांना सातत्याने पोषणविषयक मदत मिळणार आहे. तसेच त्यांचे आरोग्य आणि सर्वांगीण कल्याण सुधारण्यास मदत होणार आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल क्लबतर्फे डॉ. अश्विनी नरसन्नावर, शिवम क्रशर्स आणि पर्याय फाउंडेशन यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वय साधून विशेष परिश्रम घेतल्याबद्दल कार्यक्रमाच्या अध्यक्षा रोटेरियन रक्षा उपाध्ये यांचे विशेष कौतुक करण्यात आले.

या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन डॉ. स्फूर्ती मस्तिहोळी आणि सचिव रोटेरियन ज्योती कुलकर्णी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *