Friday , October 23 2026
Breaking News

निपाणीत सराफी दुकानात धाडसी दरोडा; २५ लाखाचा मुद्देमाल लंपास

Spread the love

 

चोरट्यांच्या तपासासाठी पथके रवाना

निपाणी (वार्ता) : निपाणी शहरातील गजबजलेल्या चन्नम्मा
सर्कल परिसरामध्ये सोमवारी (ता.१२) पहाटेच्या सुमारास सराफ दुकानावर धाडसी दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुमारे २५ लाख रुपयांचा सोन्या, चांदीचा ऐवज लंपास झाला आहे. विलास माळी असे या सराफ व्यवसायिकांचे नाव आहे.
या घटनेमुळे शहरातील सराफ व्यवसायिकासह व्यापारी आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस पोलीसांनी दिलेली माहिती अशी अधिक माहिती अशी की, पहाटेच्या सुमारास डल्ला मारून चोरट्यांनी दुकानाचे टाळे तोडून आत प्रवेश केला. परिसरातील शांततेचा फायदा घेत चोरट्यांनी धाडसी पद्धतीने ही चोरी केली. दुकानातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचा संशय व्यक्त होत आहे. सकाळी दुकान उघडण्यासाठी विलास माळी आले असता हा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांच्यासह अधिकारी, पोलीस हवालदार शेखर असोदे,
शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक गांगाप्पा पुजारी, राजू दिवटे, एम.ए. तेरादाळे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याशिवाय चोरट्यांचा तपासासाठी कर्नाटक महाराष्ट्र सीमा भागात पोलीस पथके रवाना केली आहेत.
याशिवाय दुकानासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. ठसे तज्ञांना पाचारण करून माहिती घेतली जात आहे. घटनेचे गांभीर्य पाहून मंडळ पोलीस निरीक्षक तळवार यांच्या थेट नेतृत्वाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
—
‘चोरीचा छडा लावण्यासाठी आमचे पथक सर्व ताकदीनिशी तपास करत आहे.लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल. तरीही सराफ व्यवसायकासह नागरिकांनी आपल्या दुकानासह बाहेरील बाजूस सीसी टीव्ही लावून सहकार्य करावे.’
–बी. एस. तळवार, मंडल पोलीस निरीक्षक, निपाणी
—

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *