Friday , October 23 2026
Breaking News

शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत ३ एकरातील ऊस जळून खाक

Spread the love

 

३.८० हजार रुपयाचे नुकसान ; लखनापूर येथील घटना

निपाणी (वार्ता) : लखनापूर-जत्राट हद्दीतील निपाणी मधील शेतकरी श्यामसुंदर बळवंत कोरडे यांच्या सर्वे नंबर २३५ मधील ३.५ एकर मधील ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक झाला. सोमवारी (ता.१२ दुपारी) २ वाजता ही घटना घडली. त्यामध्ये कोरडे यांचे ३ लाखाची नुकसान झाल्याची नोंद अग्निशामक दलात झाली आहे.

याबाबत घटनास्थळासह अग्निशामक दलाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील श्यामसुंदर कोरडे यांचे जत्राट-लखनापूर हद्दीमध्ये शेती असून त्यामध्ये त्यांनी उसाची लावण केली होती. सोमवारी दुपारी अचानक शेतातून गेलेल्या विविध वाहिन्यांच्या स्पर्शामुळे या ऊसाला आग लागली. त्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी आणि नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलासह पोलिसांना या घटनेची कल्पना दिली. तात्काळ येथील अग्निशामक दल आणि हा हासिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या वाहनाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. त्यामुळे परिसरातील सुमारे दहा एकर ऊस जळण्यापासून वाचला आहे. याबाबत तलाठी, हेस्कॉम अधिकारी आणि बसवेश्वर पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर संबंध अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. यावेळी सुजित जोशी, माजी नगरसेवक दिलीप पठाडे, दत्ता नाईक, मारुती शिंपूकडे, योगेश कांबळे, शिवाजी भोसले उपस्थित होते. आग आटोक्यात आणण्यासाठी येथील अग्निशामक दलाचे ठाणा अधिकारी शंकर कोरे, महेश माळगीमनी, जगदीश कांबळे, संजय दळवाई, जगदीश कमते, विलास नाईक यांच्यासह अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *