Friday , October 23 2026
Breaking News

भविष्यातील लेखक, कवी आणि नेतृत्व घडवण्यासाठी अशा स्पर्धा गरजेच्या : मालोजीराव अष्टेकर

Spread the love

 

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य वक्तृत्व स्पर्धा थाटात संपन्न

बेळगाव : वक्तृत्व स्पर्धांमुळे भविष्यातील लेखक, कवी आणि नेतृत्व घडते. अशा स्पर्धा होणे ही काळाची गरज आहे. विजयी स्पर्धकांचे अभिनंदन आहेच, पण सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचेही खऱ्या अर्थाने कौतुक आहे. राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्यामुळे सीमाभागात मराठीसाठी विविध उपक्रम राबविण्यास बळ मिळत आहे, असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी केले.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने वरेरकर नाट्य मंदिर, बेळगाव येथे आयोजित भव्य वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते.

सकाळच्या सत्रात स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन समितीचे नेते रमेश पावले व रमाकांत कोंडुस्कर यांच्या हस्ते, तर हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन अॅड. महेश बिर्जे व समितीचे नेते मदन बामणे यांच्या हस्ते करण्यात आले. मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर, सी. ए. सोमशेखर सुतार, माजी उपमहापौर संजय शिंदे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, शिवानी पाटील, शिवराज पाटील, अमित देसाई, प्रशांत भातकांडे, संतोष कृष्णाचे, उमेश पाटील, सुहास हुद्दार आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

या स्पर्धेत प्राथमिक गटात ४०, माध्यमिक गटात ३०, तर महाविद्यालयीन गटात २० स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षक म्हणून प्रा. परसु गावडे, प्रा. मयूर नागेनहट्टी, प्रा. सुरेश पाटील, श्री. वाय. पी. नाईक, श्री. बसवंत शहापूरकर, प्रा. सोनाली कांगले, प्रा. सुनीता कणबरकर यांनी काम पाहिले.

विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे:

१) प्राथमिक गट:
प्रथम – अथर्व विठ्ठल गुरव (मराठी विद्यामंदिर, तडशिनहाळ),
द्वितीय – भूमी म्हात्रू भातकांडे (बालिका आदर्श),
तृतीय – अदिती दिनकर परमोजी (मराठी विद्यानिकेतन),
चतुर्थ – भावेश संतोष चोपडे (सरकारी मराठी प्राथमिक शाळा, इदलहोंड),
पाचवा – शौर्य शिवाजी अंबुलकर (व्ही. डी. शिंदे हायस्कूल, गडहिंग्लज).

२) माध्यमिक गट:
प्रथम – सृजन अनिल पाटील (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव),
द्वितीय – क्रांती मारुती पाटील (जनता विद्यालय, तुर्केवाडी),
तृतीय – साईराज राम गुरव (मराठी विद्यानिकेतन, बेळगाव),
चतुर्थ – वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर (महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर),
पाचवा – पूर्वी रमेश घाडी (महाराष्ट्र हायस्कूल, येळ्ळूर).

३) महाविद्यालयीन गट:
प्रथम – आरती गोरल (भाऊराव काकतकर महाविद्यालय, बेळगाव),
द्वितीय – अनुजा लोहार (कला व वाणिज्य महाविद्यालय, कोवाड – चंदगड),
तृतीय – सानिका कांबळे.
उत्तेजनार्थ – भावना पाटील (बेळगाव), प्रांजली मारुती कणबरकर (आर.पी.डी. महाविद्यालय) व अश्विनी गावकर (मराठी टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, बेळगाव).

विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व मानपत्र, तर सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र आणि पुस्तक देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण मालोजीराव अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, डी. बी. पाटील, अमर येळ्ळूरकर, सुनील बाळेकुंद्री, किरण धामणेकर, सागर पाटील, बाळू गोरल, युवराज पाटील, महेश गुरव आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा समितीचे कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासु सामजी, राजू कदम, सिद्धार्थ चौगुले, खजिनदार विनायक कावळे, चिटणीस प्रतीक पाटील, पदाधिकारी सुरज कडूचकर, संतोष कृष्णाचे, किरण हुद्दार, साईनाथ शिरोडकर, महांतेश अलगोंडी, शेखर तळवार, किरण मोदगेकर, आशिष कोचेरी, आकाश भेकणे, साईराज जाधव, निखिल देसाई, सुरज चव्हाण, प्रवीण रेडेकर, रोहन कुंडेकर, अशोक पाटील, महेश चौगुले, ओंकार चौगुले, विकास भेकणे, प्रवीण कोराने, प्रवीण धामनेकर, शुभम कांबळे, आदित्य कांबळे आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *