Friday , October 23 2026
Breaking News

स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूलमध्ये पालक सभा

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ, बाहुबली संचलित स्तवनिधी येथील ए. एस. पाटील हायस्कूल येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील द्वितीय पालक सभा पार पडली. अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक महावीर पाटील होते. यावेळी पालकप्रतिनिधी म्हणून रावसाहेब यमकनमर्डी, शामबाला पाटील उपस्थित होते.
मुख्याध्यापक बी. बी. दादनवर यानी प्रास्ताविक करून पालक सभेचा उद्दिष्ट स्पष्ट केला. रावसाहेब यमकनमर्डी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

यावेळी एफ-ए २ परीक्षेत उल्लेखनीय गुण मिळवून क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार झाला. जे. डी. कोरडे यांनी दहावी परीक्षेसंदर्भात पालकांना महत्त्वपूर्ण माहिती व आवश्यक सूचना दिल्या. मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ यांनी दहावीच्या परीक्षेचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया तसेच विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी सुरू झाल्याची माहिती पालकांना दिली.
कार्यक्रमास संचालक महावीर पाटील यांच्यासह शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते.
बी. एस. स्वामी यांनी सूत्रसंचालन केले, तर आर. जे. सौदलगी यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *