Friday , October 23 2026
Breaking News

विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धत दक्षिण मध्यक्षेत्राला दुहेरी मुकुट

Spread the love

 

१४ व १७ वर्षांखालील गटांत दक्षिण मध्य क्षेत्राची बाजी; १९ वर्षांखालील गटात पश्चिम उत्तर प्रदेश विजेता

बेळगाव : विद्याभारती कर्नाटक व दक्षिण मध्य क्षेत्राच्या मार्गदर्शनाखाली विद्याभारती बेळगाव जिल्हा आणि संत मीरा इंग्रजी माध्यमिक स्कूल, अनगोळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३७ व्या विद्याभारती राष्ट्रीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत दक्षिण मध्य क्षेत्राने १४ व १७ वर्षांखालील गटांत विजेतेपद पटकाविले. तर १९ वर्षांखालील गटात पश्चिम उत्तर प्रदेश संघाने बाजी मारली.

१४ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात दक्षिण मध्य क्षेत्राने पश्चिम उत्तर प्रदेशचा १-० असा पराभव केला. विजयी संघाच्या मुक्ताने एकमेव गोल नोंदविला. १७ वर्षांखालील गटातही दक्षिण मध्य क्षेत्राने उत्तर क्षेत्राचा १-० असा पराभव केला. या सामन्यात समीक्षा खन्नुरकर हिने निर्णायक गोल करीत संघाला विजेतेपद मिळवून दिले.

१९ वर्षांखालील गटाच्या अंतिम सामन्यात पश्चिम उत्तर प्रदेशने उत्तर क्षेत्राचा २-० असा पराभव करीत विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजयी संघाकडून भूमिका हिने गोल नोंदविला.

मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला बेळगावच्या महापौर प्रीती कामकर, पोलीस उपायुक्त नारायण बरमानी, विद्याभारती क्रीडा भारतीचे राज्य सचिव अशोक शिंत्रे, पूर्वोत्तर क्षेत्राचे निरीक्षक सुबोध बोराह, राजस्थानचे कमलेश शर्मा, विद्याभारतीचे राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, राघवेंद्र कागवाड, राज्य क्रीडा प्रमुख देवेंद्रजी, जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर, सचिव डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, संत मीरा स्कूलचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी आणि ऋतुजा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. यावेळी विद्याभारतीचे जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख चंद्रकांत पाटील, अनुराधा पुरी, शिवकुमार सुतार, जयसिंग धनाजी, बापू देसाई, हर्ष रेडेकर, उमेश मजुकर, बसवत पाटील, सुनील तगारे, मानस नायक यांच्यासह विविध क्षेत्रांतील क्रीडाशिक्षक आणि आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण पावसकर यांनी केले. धनश्री पाटील आणि सविता पाटणकर यांनी आभार मानले. शांतीमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *