Friday , October 23 2026
Breaking News

उद्याच्या शेतकरी आंदोलनाचा प्रशासनाला धसका, महामार्गाऐवजी ग्रामीण भागातून वाहतूक वळविणार

Spread the love

 

बेळगाव : विविध शेतकरी संघटनांनी मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील हत्तरगी आणि हिरेबागेवाडी टोल नाक्यांवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पोलिसांनी जड आणि हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग जाहीर केले आहेत.

जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग
बेळगावच्या दिशेने येणाऱ्या जड वाहनांसाठी पुढील मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मार्ग १ : धारवाड – अळनावर – रामनगर – खानापूर – बेळगाव.
मार्ग २ : धारवाड – लिंगसुगूर क्रॉस – बिडी – नंदगड – खानापूर – बेळगाव.
मार्ग ३ : कित्तूर – बिडी – नंदगड – खानापूर – बेळगाव.
मार्ग ४ : धारवाड – कित्तूर – एम. के. हुबळी – परिश्वाड – खानापूर – बेळगाव.

हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग

मार्ग १ : गोकाक – निपाणी – चिक्कोडी – गोकाक.
मार्ग २ : गोकाक – कमतनूर गेट – हुक्केरी – संकेश्वर – गोकाक.
याशिवाय यरगट्टीहून बेळगावकडे येणाऱ्या वाहनचालकांना यरगट्टी – बागलकोट/विजयपूर या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *