Friday , October 23 2026
Breaking News

दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिरात महिषासुरमर्दिनी मूर्तीचे अनावरण

Spread the love

 

स्वच्छता दूत आणि माळी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सोहळा

बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिणकाशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता कपिलेश्वर मंदिरात दक्षिणकाशीच्या महिषासुरमर्दिनी मूर्तीचा अनावरण सोहळा उत्साहात पार पडला.

गणेश विसर्जनाच्या काळात कपिलेश्वर मंदिर परिसरातील दोन्ही तलावांवर सलग तीन दिवस अहोरात्र स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता दूतांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण करण्यात आले. सॅनिटरी इन्स्पेक्टर आनंद पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडली. त्यांच्या कार्याची दखल घेत मंदिर संस्थानने त्यांना हा सन्मान दिला.

नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित महाआरती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, माळी गल्लीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. या मंडळाने गेल्या सहा वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा जपली आहे. यंदा आपल्या सार्वजनिक गणपतीचे सर्वप्रथम विसर्जन केल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना महाआरतीचा मान देण्यात आला.

मूर्ती अनावरण आणि महाआरतीनंतर कपिलेश्वर महादेव ट्रस्टच्या वतीने सर्व स्वच्छता दूत तसेच गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिराचे अध्यक्ष राहुल कुरणे, विवेक पाटील, राजू भातखंडे, अभिजीत चव्हाण, अजित जाधव, दौलत साळुंखे, अनिल मुतकेकर, प्रथमेश कावळे, ज्योतिबा कावळे, मंदिराचे सेवेकरी आणि महिला सेवेकरी उपस्थित होते.

या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. फटाक्यांच्या नेत्रदीपक आतषबाजीमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

चव्हाट गल्लीतील प्रसिद्ध कलाकार प्रवीण राणे यांनी महिषासुरमर्दिनीची सुंदर मूर्ती साकारल्याबद्दल त्यांचाही ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई आणि ध्वनियंत्रणा उपलब्ध करून दिल्याबद्दल पोगो साऊंडचे अभिजीत पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *