Friday , October 23 2026
Breaking News

मेंढपाळाच्या मुलीला ‘बीडीएस’साठी शासकीय कोट्यातून प्रवेश बेनाडीच्या साक्षी सौंदलगे हिचे लख्ख यश

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : मेंढपाळ समाजातील बेनाडीतील कन्या साक्षी काकासाहेब सौंदलगे हिला बंगळुरू येथील ऑक्सफर्ड डेंटल(दंतवैद्यकीय) महा विद्यालयात सरकारी कोट्यातून प्रवेश मिळाला आहे. तिच्या या लख्ख यशामुळे गावासह मेढपाळ समाजात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिवाय बेनाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
बेनाडीतील काकासो हल्लाप्पा सौंदलगे यांची कन्या तर निपाणीतील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेचे हारुगेरी शाखेचे व्यवस्थापक बाळासाहेब सौंदलगे यांची ती पुतणी आहे. तिने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दंतवैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत शासकीय कोट्यातून नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवणे ही तिच्याससह कुटुंबासाठी अभिमानाची बाब आहे.
साक्षीनेपहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण कन्नड स्कूल, बेनाडी येथे पूर्ण केले. त्यानंतर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण एस. के. हायस्कूल, बेनाडी येथे घेतले. अकरावी व बारावीचे शिक्षण साई निकेतन, मुधोळ (ता. मुधोळ, जि. बागलकोट ) येथे पूर्ण केले. या शैक्षणिक प्रवासात तिने आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे.साक्षीच्या या शैक्षणिक वाटचालीत तिचे काका बाळासो सौंदलगे यांचे सहकार्य लाभले. तर हारुगेरी येथील प्रसिद्ध वैद्य डॉ. एस. एस. चनगौडर यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशामुळे समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण घेण्यासाठी, मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव परिसरात दसऱ्यानिमित्त आयुध पूजनासह सीमोल्लंघन सोहळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : विजयादशमी निमित्त बोरगाव शहर आणि परिसरात विविध कार्यक्रमासह आयुध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *