बेळगाव : बसवान गल्ली येथील जिजामाता महिला सहकारी बँक लिमिटेडची ५३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी मराठा मंदिर येथे उत्साहात पार पडली. बँकेच्या चेअरपर्सन लीला गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सन २०२५-२६ मधील बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या आर्थिक वर्षात बँकेने ७७ लाख ४७ हजार …
Read More »बेळगावात ३५० विद्यार्थ्यांनी बांधल्या १००० हून अधिक राख्या
बेळगाव : रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न ठेवता कृतज्ञता, मानवता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देत कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळेच्या कॅम्प बेळगाव येथील सुमारे ३५० विद्यार्थ्यांनी १००० हून अधिक राख्या बांधल्या. कॅन्टोन्मेंट बोर्ड मराठी प्राथमिक शाळा आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कल टीम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमात …
Read More »कासम तळ्याच्या विकासासाठी देसूर काँग्रेस कमिटीचा पुढाकार
देसूर : देसूर येथील कासम तळ्याच्या परिसरात नागरिकांसाठी ट्रॅकिंग पॉईंट, चालण्याचा मार्ग, बसण्याची व्यवस्था व विरंगुळ्याचे ठिकाण विकसित करण्यासाठी देसूर काँग्रेस कमिटी व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. या विकासकामास आमदार मा. लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी मंजुरी दिली असून, पुढील कार्यवाहीसाठी कासम तळ्याचा एरिया व संबंधित उतारा उपलब्ध करून देण्याची मागणी …
Read More »पायोनियर बँकेची रविवारी वार्षिक सर्वसाधारण सभा
बेळगाव : “येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने 2025- 26 या आर्थिक वर्षात बँकेला 1 कोटी 94 लाखाचा ढोबळ नफा तर आयकर व इतर तरतुदिनंतर 1 कोटी 14 लाखाचा निव्वळ नफा मिळवला आहे” अशी माहिती बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर यांनी दिली. 120 वर्षे पूर्ण करून शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या …
Read More »३१ ऑगस्ट रोजी चलवेनहट्टी येथे महाप्रसादाचा कार्यक्रम
बेळगाव : चलवेनहट्टी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही श्रावण महिन्यात महाप्रसादचे (परव) आयोजन करण्यात आले आहे यावेळी श्रावण महिनाच्या तिसऱ्या सोमवारी दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी पहाटे पाच वाजता मंदिरात अभिषेक घालण्यात येणार आहे, त्यानंतर पुजा-अर्चा करण्यात येणार आहे. देवाच्या सर्व विधी पूर्ण …
Read More »रक्षाबंधन समाजात शांती सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश देणारा सण : ब्रम्हाकुमारी मिनाक्षी दीदी
बेळगाव : आजच्या काळात, रक्षाबंधनाची व्याप्ती केवळ भाऊ-बहिणींच्या नात्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. हा सण समाजात शांती, प्रेम, सलोखा आणि बंधुत्वाचा संदेश देणारा आहे असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी मिनाक्षी दीदी यांनी केले. सरस्वती रोड येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या शहापूर केंद्रात आज शुक्रवारी सकाळी रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या …
Read More »बसस्थानकात चोरट्यांचा धुमाकूळ; महिलेचे साडेपाच लाखांचे दागिने लंपास
गर्दीचा फायदा घेत डाव साधला; सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू बेळगाव : बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी एका महिलेच्या बॅगेतील तब्बल ५ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशांची वर्दळ असलेल्या बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातच चोरीची ही घटना घडल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर …
Read More »जय जनकल्याण सौहार्द सहकारी संस्थेची नववी वार्षिक सभा उत्साहात
सभासदांना २५ टक्के लाभांश जाहीर; ग्रामीण भागातील पहिली सौहार्द संस्था ठरल्याचा दावा मण्णूर : जय जनकल्याण सौहार्द सहकारी संघ नियमित, मण्णूर या संस्थेची नववी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेच्या सभासदांना २५ टक्के लाभांश देण्याची शिफारस करण्यात आली. ग्रामीण भागातील सौहार्द सहकारी संस्थांमध्ये २५ …
Read More »वैजनाथ मंदिरात कुद्रेमानी काँग्रेस कमिटीचा श्रावण महाप्रसाद
कुद्रेमानी (प्रतिनिधी) : श्रावणमासाच्या पावन पर्वाचे औचित्य साधून कुद्रेमानी काँग्रेस कमिटीच्या वतीने वैजनाथ मंदिर येथे गुरुवार, दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी श्रावण महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा आणि गावातील बंधुभाव वृद्धिंगत करणाऱ्या या उपक्रमास २५० हून अधिक भाविक भक्तांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत महाप्रसादाचा भक्तिभावाने लाभ घेतला. …
Read More »वीजेचा धक्का लागून कृष्णा नदीत पडलेला युवक बेपत्ता
बेळगाव : मोटारपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या युवकाला वीजेचा धक्का बसून तो कृष्णा नदीत पडल्याची घटना रायबाग तालुक्यातील खेमलापूर येथे गुरुवारी सकाळी घडली. या घटनेनंतर युवक बेपत्ता झाला असून, त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बसवराज ऐनापूर असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे. खेमलापूर गावाजवळून वाहणाऱ्या कृष्णा नदीकाठी तो सकाळी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta