Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगाव

“SIR” संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीची उद्या मराठा मंदिर येथे महत्त्वपूर्ण बैठक

  बेळगाव : सीमाभागात सुरू असलेल्या विशेष मतदार फेरनिरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव दक्षिण व उत्तर मतदारसंघातील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि मराठी भाषिक नागरिकांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. ही बैठक रविवार, ५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता मराठा मंदिर, खानापूर रोड, बेळगाव येथे होणार आहे. सीमाभागात …

Read More »

पिरनवाडीतील सोन्याच्या दुकानफोडीचा छडा; गोव्यातील 18 वर्षीय आरोपी अटकेत, 4.78 लाखांचे दागिने जप्त

  बेळगाव : पिरनवाडी येथील कामाक्षी ज्वेलर्समध्ये झालेल्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा उलगडा करण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले असून, गोव्यातील 18 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून ₹4 लाख 78 हजार किंमतीचे 34 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मे 2026 रोजी शास्त्रीनगर, …

Read More »

दर शुक्रवारी धावणार पंढरपूर–यशवंतपुर एक्सप्रेस; मिरज–बेळगाव–हुबळी मार्गे प्रवासाला नवी जोडणी

  बेळगाव : नैऋत्य रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाची घोषणा केली असून पंढरपूर ते यशवंतपुर (बेंगळुरू) दरम्यान नवीन साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे मिरज, बेळगाव आणि हुबळी मार्गे धावणार असून दर शुक्रवारी एकदा ही सेवा उपलब्ध राहणार आहे. सुमारे 880 किलोमीटरचा प्रवास ही गाडी अंदाजे 15 तास …

Read More »

इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे प्रथमोपचार व सीपीआर जनजागृती कार्यक्रम संपन्न

  बेळगाव : एखाद्या आजारी किंवा जखमी व्यक्तीला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत त्याचा जीव वाचवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न म्हणजे प्रथमोपचार होय. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला प्रथमोपचार आणि सीपीआर (हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन) याची मूलभूत माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन इंडियन रेड क्रॉस सोसायटी (IRCS)च्या खजिनदार लेफ्टनंट कर्नल विनोदिनी शर्मा यांनी …

Read More »

रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणचा सेवाभावी उपक्रम; श्रवण तपासणी व हिअरिंग एड वितरण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

  बेळगाव : समाजातील श्रवणदोष असलेल्या नागरिकांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पण आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऑडिओमेट्री श्रवण तपासणी व हिअरिंग एड वितरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्या अध्यक्षा रोटेरियन ऍड. विजयलक्ष्मी मन्निकेरी आणि सचिव रोटेरियन …

Read More »

माध्यमिक शाळांतील सहशिक्षकांना व्याख्याता पदोन्नती प्रक्रियेला वेग; कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश

  बेळगाव : सरकारी माध्यमिक शाळांतील सहशिक्षकांना सरकारी पदवी पूर्व महाविद्यालयातील व्याख्याता पदावर पदोन्नती देण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. यासाठी घेण्यात आलेल्या पात्रता परिषदेत 50 टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनी आवश्यक कागदपत्रे ४ जुलैपर्यंत तीन प्रतींमध्ये सादर करावीत, असे निर्देश जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. शालेय …

Read More »

हुणसीकोळ मठाच्या श्रींवर हल्ल्याचा प्रयत्न; आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील यमकनमरडी येथील हुणसीकोळ मठाचे श्री शिद्धबसव स्वामीजी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी यमकनमर्डी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मठालगत राहणाऱ्या मेदार कुटुंबीयांनी स्वामीजींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी आनंद मेदार, रत्ना मेदार, मंजुनाथ, प्रवीण मेदार यांच्यासह …

Read More »

वारा-पावसामुळे कोसळलेल्या झाडांची महापालिकेकडून तातडीने दखल; वाहतूक पूर्ववत

  बेळगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बेळगाव शहरातील विविध भागांत अनेक झाडे रस्त्यावर कोसळली. शुक्रवारी कुमारस्वामी लेआऊटसह शहरातील अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. घटनेची माहिती मिळताच महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. …

Read More »

विद्या भारती फुटबॉल स्पर्धत संत मीरा अनगोळ विजेतेपद

  बेळगाव : टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्रबोस लेले मैदानावर विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत संत मीरा इंग्रजी शाळा अनगोळ आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत संत मीरा अनगोळ शाळेने चारी गटाचे विजेतेपद पटकावित चौकार मारला. आता या सघाची राज्य फुटबॉल स्पधसाठी निवड झाली आहे. प्राथमिक मुलींच्या गटातील अंतिम लढतीत संत मीरा शाळेने …

Read More »

न्यू गुड्स शेड रस्त्याच्या तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी; महापालिका आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : डेक्कन हॉस्पिटलसमोरील, बसवेश्वर रेल्वे उड्डाणपुलाजवळील न्यू गुड्स शेड रस्त्याची तात्काळ कायमस्वरूपी दुरुस्ती करून दोन्ही बाजूंना जलनिस्सारण गटारी उभाराव्यात, अशी मागणी समाजसेवक गणेश दड्डीकर यांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वी १० जून २०२६ रोजीही याच मागणीसाठी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर संबंधित विभागाच्या सेक्शन ऑफिसर यांनी जागेची …

Read More »