Friday , October 23 2026
Breaking News

ऊसदर आंदोलनाचा दुसरा दिवस; रेल्वे स्थानके, विमानतळ बंद करण्याचा चन्नाप्पा पुजारी यांचा इशारा

Spread the love

 

केंद्र सरकारने आज मागण्यांवर प्रतिसाद न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा शेतकरी नेत्यांचा निर्धार

बेळगाव : उसाला योग्य दर मिळावा यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाने बुधवारी दुसऱ्या दिवसात प्रवेश केला. केंद्र सरकारने आज शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करून रेल्वे स्थानके आणि विमानतळ पूर्णपणे बंद पाडण्याचा इशारा शेतकरी नेते चन्नाप्पा पुजारी यांनी दिला आहे.

बुधवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना पुजारी यांनी केंद्र सरकारला आंदोलनाची दखल घेण्याचे आवाहन केले. “केंद्र सरकारने आज शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद दिला नाही, तर रेल्वे स्थानके आणि विमानतळ पूर्णपणे बंद करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, साखरेची किमान विक्री किंमत वाढवावी, इथेनॉल खरेदीबाबत योग्य धोरण राबवावे आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविण्यात येईल, असे पुजारी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सरकार काय भूमिका घेते आणि चर्चेतून तोडगा निघतो का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *