Friday , October 23 2026
Breaking News

खानापूर-बेळगाव महामार्गावर भीषण अपघात; पेपरच्या ट्रकचे दोन तुकडे, चालक सुदैवाने बचावला!

Spread the love

 

कुपटगिरी रस्त्यावरील पुलावर पहाटे दुर्घटना; ४०० ते ५०० मीटरपर्यंत पेपरचे बंडल विखुरले

खानापूर : खानापूर-बेळगाव नवीन महामार्गावरील जुन्या कुपटगिरी रस्त्याच्या पुलावर बुधवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे पेपरचे बंडल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की ट्रकचा पुढील इंजिनचा भाग आणि मागील मालवाहू भाग वेगळे झाले. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत चालकाचा जीव वाचला असून त्याला किरकोळ खरचटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा ट्रक दांडेली येथील पेपर मिलमधून पेपरचे बंडल घेऊन दिल्लीच्या दिशेने जात होता. पहाटेच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक पुलाच्या बाजूच्या कठड्याला जोरदार धडकला. या धडकेमुळे ट्रकचे मोठे नुकसान होऊन त्याचे दोन भाग झाले.

अपघातानंतर ट्रकमधील पेपरचे बंडल महामार्गावर दूरवर विखुरले. सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत बंडल पसरल्याने अपघाताची भीषणता स्पष्ट झाली.

घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेबैल येथील महामार्गावरील टोलनाक्यालाही अपघाताची माहिती देण्यात आली.

दरम्यान, लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष व विद्यमान पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते लायन्स अजित पाटील हे पहाटे फिरण्यासाठी गेले असताना त्यांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी घटनास्थळाचे फोटो व व्हिडिओ पाठवून घटनेची माहिती दिली तसेच ट्रकचालकाची विचारपूस केली.

या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून महामार्गावर पेपरचे बंडल विखुरल्याने परिसरात खळबळ उडाली. ट्रकची अवस्था पाहता मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती; मात्र चालक किरकोळ दुखापतीवर बचावल्याने मोठा अनर्थ टळला.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर समिती लढवणार जि. पं. व ता. पं. निवडणुका

Spread the love  जागृतीसाठी विभागवार बैठका घेणार १ नोव्हेंबर गांभीर्याने पाळण्याचे आवाहन खानापूर : जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *