Friday , October 23 2026
Breaking News

केपीटीसीएल आणि जेएनएमसी रस्त्यावरील अतिक्रमणे महापालिकेने हटविली; पुन्हा अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा

Spread the love

 

 

बेळगाव : शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केपीटीसीएल आणि जेएनएमसी रस्त्यावरील फूटपाथ व रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम राबविली.

महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. फूटपाथ आणि रस्त्यांवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना अधिकाऱ्यांनी प्रथम इशारा दिला. त्यानंतर महापालिका कर्मचाऱ्यांच्या मदतीने अतिक्रमित वस्तू हटविण्यात आल्या.

या मोहिमेत महापालिकेच्या महसूल, आरोग्य आणि अभियांत्रिकी विभागांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. काही दुकानदारांनी अतिक्रमण स्वतःहून हटविण्यासाठी वेळ मागितल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या विनंतीला प्रतिसाद देत मुदत दिली.

सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश दुकानदारांना देण्यात आले. तसेच, पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिका अधिकाऱ्यांनी दिला.

या कारवाईत महापालिका विभागीय आयुक्त अनिल बोरगावी, अभियंते देशपांडे, अनूप वाहिद, आदिल खान यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *