Friday , October 23 2026
Breaking News

सावगावमध्ये २२ नोव्हेंबरपासून ‘पाटील ट्रॉफी’चा थरार!

Spread the love

 

अखिल भारतीय खुल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेतील विजेत्याला दोन लाखांचे बक्षीस; ग्रामीण स्पर्धेतील विजेत्याला ५१ हजार रुपये

सावगाव : सावगाव येथे क्रिकेटप्रेमींसाठी ‘पाटील ट्रॉफी २०२६-२७’ अंतर्गत अखिल भारतीय खुली टेनिस क्रिकेट स्पर्धा आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धांमध्ये विविध संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

श्री. कल्लाप्पा मल्लाप्पा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सर्व सामने सावगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर खेळविण्यात येणार आहेत.

अखिल भारतीय खुल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाला दोन लाख रुपये आणि आकर्षक ट्रॉफी, तर उपविजेत्या संघाला एक लाख रुपये आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ५१ हजार रुपये आणि ट्रॉफी, तर द्वितीय क्रमांकाच्या संघाला २५ हजार रुपये आणि ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहे.

याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि अन्य उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दोन्ही स्पर्धा आठ षटकांच्या स्वरूपात खेळविण्यात येणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांसाठी नोंदणीची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक संघांनी मुदतीपूर्वी नोंदणी करून स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९९०२६७१५०६, ९९४५४०९१९७, ७४८३८३५३८५ आणि ९९६४४९६४१९ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *