लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाची मनपा आयुक्तांकडे मागणी बेळगाव : गणेशोत्सवाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले असताना बेळगाव शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गणेशमूर्तींचे आगमन, मिरवणुका तसेच विसर्जनाच्या मार्गांवर नागरिक, भाविक आणि गणेशोत्सव मंडळांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने युद्धपातळीवर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती …
Read More »दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या आरोपीला ५० रोपे लावण्याची शिक्षा
चिकोडी : दारूच्या नशेत गोंधळ घातल्याप्रकरणी चिकोडी जेएमएफसी न्यायालयाने आरोपीला अनोखी शिक्षा सुनावली आहे. यक्षंबा शहरातील अनिल निंगाप्पा पुजारी याने स्वतःहून आपली चूक मान्य केल्याने न्यायालयाने त्याला ५० रोपे लावण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार चिकोडी न्यायालयाच्या आवारात २५ तर सदलगा पोलीस ठाण्याच्या आवारात २५ अशी एकूण ५० रोपे लावण्याचे निर्देश …
Read More »तळागाळातील समाजसेवेसाठी सेवाभावी संस्थांची भूमिका महत्त्वाची : ॲडमिरल रघुवीर पुरंदरे
अलायन्स क्लब ऑफ वेणुग्रामचा उद्घाटन व अधिकारग्रहण सोहळा उत्साहात बेळगाव : देश विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग आणि विविध क्षेत्रांत झपाट्याने प्रगती करत असला, तरी विकासाचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी सेवाभावी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. समाजातील गरजू, निराधार, ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा ओळखून …
Read More »कारंजीमठ येथे सर्वसामान्यांसाठी दुसऱ्या शववाहिकेचे लोकार्पण; रमाकांत आणि चंद्रकांत कोंडुस्कर यांचा सामाजिक उपक्रम
बेळगाव : शिवबसव नगर येथील कारंजीमठ, जोतीबा मंदिर परिसर येथे दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सामाजिक बांधिलकीतून जनतेच्या सेवेसाठी सज्ज असलेल्या दुसऱ्या शववाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. श्रीराम सेना हिंदुस्थान आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या सहकार्याने विविध सामाजिक कार्य करण्यात येतात, त्याच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून ही सेवा सुरू करण्यात …
Read More »मनसेकडून सीमावासीयांच्या जखमेवर मीठ; कन्नड रक्षक वेदिकेसोबत हातमिळवणी
बेंगळुरू/मुंबई : हिंदी भाषेच्या वाढत्या प्रभावाविरोधात आणि भारतीय प्रादेशिक भाषांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि कन्नड रक्षक वेदिके या दोन संघटना एकत्र आल्या आहेत. कर्नाटकात झालेल्या बैठकीत दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय भाषांच्या हक्कांसाठी संयुक्तपणे लढण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी ‘इंडियन लँग्वेजेस फोरम’ स्थापन करण्यासह १० कलमी ‘कॉमन …
Read More »“बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग” ठराव करण्याचा सरकारचा महापालिकेला आदेश!
उद्या पत्रकार परिषदेत होणार खुलासा बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेत कर्नाटकाच्या समर्थनार्थ ठराव मंजूर करण्यात यावा, या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या कन्नड संघटनांना अखेर यश मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. राज्य सरकारने महापालिकेत कर्नाटक समर्थक ठराव मंजूर करण्यासंदर्भात अधिकृत आदेश जारी केल्याचे बेळगावातील कन्नड संघटनांच्या महासंघाने म्हटले आहे. …
Read More »सर्वर डाऊन अन् वीज खंडितमुळे रेशन वितरण रखडले; जिल्ह्यात लाखो नागरिक धान्यापासून वंचित
बेळगाव : रेशन वितरण प्रक्रियेमध्ये सर्वर डाऊनची समस्या जैसे थे असून, परिणामी जिल्ह्यात अद्यापही केवळ ८४.३६ टक्केच रेशन धान्याचे वितरण झाले आहे. ऑगस्ट महिना संपला तरीही मागील महिन्याचे रेशन वितरण सुरूच असून, जिल्ह्याभरातील तब्बल १ लाख ७७ हजार ७८० रेशनकार्ड धारक अद्यापही धान्याच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न व …
Read More »बेळगावातील BSNL नेटवर्क समस्येवर तातडीने उपाययोजना करा
ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनची खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे मागणी बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरातील विविध भागांमध्ये BSNL मोबाईल नेटवर्कची समस्या गंभीर बनली असून, ग्राहकांना सुरळीत सेवा मिळण्यासाठी तातडीने आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली. असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील, सचिव कमरुद्दीन सौदागर …
Read More »वडगाव जनावरांचा दवाखाना स्टाफअभावी बंद; शेतकऱ्यांची गैरसोय
वडगाव : जुने बेळगाव व वडगाव परिसरातील हजारो जनावरांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून चावडीच्या जागेत सुरू असलेला जनावरांचा दवाखाना सध्या स्टाफअभावी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शेतकरी तसेच पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात बैल, गाई, म्हशी, शेळ्या यांसह कुत्री व मांजर पाळणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय उपचारांसाठी हा …
Read More »युवकांना संघटित करून गावाच्या विकासाला दिशा देणारे नेतृत्व म्हणजे कै. अशोकराव मोदगेकर : श्री. वसंत पाटील
निलजी : रणझुंझार परिवार व कै. अशोकराव मोदगेकर प्रतिष्ठानतर्फे समाजाच्या प्रगतीसाठी तळमळीने कार्य करणारे तसेच रणझुंझार परिवारातील विविध संघ-संस्थांचे संस्थापक कै. अशोकराव नारायणराव मोदगेकर यांचा सहावा स्मृतिदिन निलजी येथे गांभीर्यपूर्ण वातावरणात पाळण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई अशोकराव मोदगेकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून रणझुंझार शिक्षण …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta