अथणी : अथणी शहरातील जत रस्त्यावर असलेल्या प्रसिद्ध ‘ब्रह्मा एंटरप्रायझेस’ या मॉलसदृश मोठ्या दुकानाला रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत फर्निचर, ब्रँडेड कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत एक कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत …
Read More »अक्कोळ पिकेपीएस सभासदांचा पत मंजुरीसाठी बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर २२ ला मोर्चा
निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील विविध उद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकार संस्थेचे सन २०२५ ते २०२७-२८ या सालाकरिता कर्जाची पत मंजुरीस जिल्हा बँकेकडून वारंवार मागणी करूनही पत रोखून धरण्यात आली आहे. त्यासाठी संस्थेकडून १४ जुलै २०२५ ला आवश्यक कागदपत्रकासह क्रमवार पत्रके दाखल केली आहेत. संबंधित अधिकाऱ्याकडूनही तपासणी होऊनही मंजुरी …
Read More »डिजिटल अरेस्टच्या भीतीने निवृत्त अधिकाऱ्याला ४२.४० लाखांचा गंडा
सीबीआय अधिकारी असल्याचा बनाव; व्हिडिओ कॉलद्वारे धमकावून आठवडाभरात उकळले लाखो रुपये बेळगाव : सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून डिजिटल अरेस्टची भीती दाखवत सायबर भामट्यांनी टिळकवाडी येथील ७२ वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला तब्बल ४२ लाख ४० हजार रुपयांना गंडा घातला. मोबाईल क्रमांकाचा वापर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करण्यासाठी झाल्याचा आरोप करून आरोपींनी त्यांना …
Read More »सावगाव तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
मित्रांसमवेत फिरायला गेला होता; जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास बेळगाव : सावगाव येथील तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. सागर राजू जिद्दी (वय २४, रा. होनगा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. उपस्थितांनी …
Read More »राजहंस गल्लीच्या ‘राजा’चा देशभरात डंका! राष्ट्रीय स्तरावरील गणेशोत्सव स्पर्धेत द्वितीय क्रमांक
बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेत भक्ती, एकता, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अनगोळ येथील श्री राम युवक मंडळ, राजहंस गल्लीच्या गणरायाने अटकेपार झेंडा रोवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित २०२६ च्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत राजहंस गल्लीच्या राजाला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला आहे. या …
Read More »बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे २० ऑक्टोबरला दसरा महोत्सव; लोकप्रनिधीसह प्रशासनाला आमंत्रण
बेळगाव : बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी पारंपरिक दसरा महोत्सव आणि सिमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४.३० वाजता विद्यानिकेतन मैदानावर (ज्योती कॉलेज मैदान) हा सोहळा पार पडणार आहे. सोहळ्याची सुरुवात चव्हाट गल्लीतील श्री जोतिबा देवाच्या सासनकाठीची आणि नंदीची विधिवत पूजा करून होईल. त्यानंतर …
Read More »कर्नाटकावर जलसंकटाचे गंभीर सावट; १०८ वर्षांतील विक्रमी पर्जन्यतूट!
सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पाऊस; ईशान्य मोसमी पावसावर आशा, अन्यथा आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती बेळगाव : कर्नाटकात यंदा नैऋत्य मोसमी पावसाने पाठ फिरवल्याने आगामी उन्हाळ्यात जलसंकटाची भीती गडद झाली आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ३२ टक्के कमी …
Read More »व्यसनाधीनता संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारा मूक शत्रू : पीएसआय राघवेंद्र खोत
शिवानंद महाविद्यालयात ‘नशामुक्त युवा भारत’ अभियान; योग आणि स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके कागवाड : “मादक पदार्थांचे सेवन आणि व्यसनाधीनता ही केवळ व्यक्तीच्या आरोग्यालाच हानी पोहोचवत नाही, तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारा मूक शत्रू आहे. व्यसनांच्या विळख्यात अडकून तरुणांनी आपले अनमोल आयुष्य वाया घालवू नये. शिक्षण, क्रीडा आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य …
Read More »स्वामिनी प्रज्ञानंद यांचे नवदुर्गांच्या दिव्यशक्तीविषयी मार्गदर्शन; सुहासिनी महिला मंडळाचा भक्तिमय उपक्रम
बेळगाव : वडगाव येथील पटवर्धन लेआउटमधील सुहासिनी महिला मंडळातर्फे यंदाच्या नवरात्रोत्सवाचा प्रारंभ श्रीसूक्त पठण, कुंकूमार्चन, भजन-सत्संग आणि महाआरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिमय वातावरणात करण्यात आला. श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जेने भारलेल्या या सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. चिन्मय मिशनच्या स्वामिनी प्रज्ञानंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा संपन्न झाला. …
Read More »‘एसटीएम’च्या आई भवानी देवीला ‘श्री रेणुकादेवी महिला मंडळा’कडून मानाची साडी-चोळी
बेळगाव : ‘एसटीएम’ समर्थ नगरची आई भवानी देवीला श्री रेणुका देवी महिला मंडळाच्यावतीने मानाची साडी-चोळी देण्यात आली. गुरुवारी सायंकाळी समर्थनगर, क्रॉस नंबर 5 येथून श्री रेणुका देवी महिला मंडळाच्या भगिनींनी सवाद्य मिरवणुकीद्वारे ही मानाची साडी-चोळी ‘एसटीएम’ समर्थ नगरच्या आई भवानी देवीच्या शामियान्यात नेली. यावेळी भगिनींनी डोईवर पवित्र कलश आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta