Friday , October 23 2026
Breaking News

राजहंस गल्लीच्या ‘राजा’चा देशभरात डंका! राष्ट्रीय स्तरावरील गणेशोत्सव स्पर्धेत द्वितीय क्रमांक

Spread the love

 

 

बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या परंपरेत भक्ती, एकता, सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या अनगोळ येथील श्री राम युवक मंडळ, राजहंस गल्लीच्या गणरायाने अटकेपार झेंडा रोवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे आयोजित २०२६ च्या सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेत राजहंस गल्लीच्या राजाला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला आहे. या यशामुळे बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

राजहंस गल्लीच्या राजाचा नावलौकिक आता देशपातळीवर पोहोचला असून, मंडळाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धा जोपासतानाच सामाजिक एकता आणि बांधिलकीची भावना वृद्धिंगत करण्याच्या मंडळाच्या प्रयत्नांना या यशामुळे मोठी दाद मिळाली आहे.

या पुरस्कार सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, डॉ. किरण कुलकर्णी, पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर, अभिनेते सागर कारंडे, पंढरीनाथ कांबळे आणि जयवंत वाडकर यांच्यासह देशभरातील मूर्तिकार, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजहंस गल्लीच्या राजाला मिळालेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आणि सांस्कृतिक वैभव देशभर अधोरेखित झाले आहे. मंडळाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल गणेशभक्त आणि बेळगावकरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *