Friday , October 23 2026
Breaking News

बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे २० ऑक्टोबरला दसरा महोत्सव; लोकप्रनिधीसह प्रशासनाला आमंत्रण

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी पारंपरिक दसरा महोत्सव आणि सिमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४.३० वाजता विद्यानिकेतन मैदानावर (ज्योती कॉलेज मैदान) हा सोहळा पार पडणार आहे.

सोहळ्याची सुरुवात चव्हाट गल्लीतील श्री जोतिबा देवाच्या सासनकाठीची आणि नंदीची विधिवत पूजा करून होईल. त्यानंतर हुतात्मा चौक येथे शहरातील विविध देवस्थानांच्या पालख्या आणि सासनकाठ्या एकत्र येतील. वाद्यांच्या गजरात मिरवणुकीने त्या सिमोल्लंघन मैदानाकडे रवाना होतील.

मैदानावर बेळगावचे वतनदार चव्हाण-पाटील घराण्याकडे असलेल्या पारंपरिक तलवारीचे देवस्थान मंडळातर्फे शस्त्रपूजन करण्यात येणार आहे. यावेळी शहरातील मान्यवरांचा सत्कारही केला जाणार आहे.

मंडळाचे अध्यक्ष रणजित चव्हाण-पाटील आणि सेक्रेटरी परशराम माळी यांनी महापौर प्रीती कामकर, आमदार आसिफ सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त प्रकाश निकम आणि मनपा आयुक्त कार्तिक एम. यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांना निमंत्रित केले आहे.

या पारंपरिक दसरा महोत्सवाला शहरातील पंच मंडळांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान मंडळाने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *