Friday , October 23 2026
Breaking News

सावगाव तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

Spread the love

 

मित्रांसमवेत फिरायला गेला होता; जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास

बेळगाव : सावगाव येथील तलाव परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. सागर राजू जिद्दी (वय २४, रा. होनगा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. उपस्थितांनी त्याला पाण्याबाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र, उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर शुक्रवारी दुपारी मित्रांसमवेत सावगाव तलाव परिसरात गेला होता. यावेळी तो तलावाच्या पाण्यात उतरला असता खोलीचा अंदाज न आल्याने बुडू लागला. हा प्रकार लक्षात येताच मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. दरम्यान, अवधूत तुडवेकर आणि त्यांचे सहकारीही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. सर्वांनी प्रयत्नपूर्वक सागरला पाण्याबाहेर काढले आणि बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांच्या उपचारांनंतरही त्याला वाचवता आले नाही.

या घटनेमुळे होंगा परिसरात शोककळा पसरली असून, तरुणाच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *