


७ हजार ७०० रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त
बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येळ्ळूर आणि हिंडलगा येथे अवैध मटका जुगाराविरोधात पोलिसांनी छापे टाकून दोघांना अटक केली. या कारवाईत ७ हजार ७०० रुपये रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे ओसी कार्ड जप्त करण्यात आले.
नागेश मारुती भोगले आणि श्याम बबनदास गुलाबानी अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. सार्वजनिक ठिकाणी आकड्यांवर पैसे लावून आर्थिक फायद्यासाठी मटका जुगार खेळत असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय संतोष दलवाई आणि बी. डी. सरनाई यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली. दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.
अवैध जुगाराविरोधात केलेल्या या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

Belgaum Varta Belgaum Varta