Friday , October 23 2026
Breaking News

रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांची नाना पाटेकर यांना रांगोळीतून श्रद्धांजली; आठ तासांत साकारले चित्र

Spread the love

 

बेळगाव : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असताना, बेळगावचे रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

एक चित्रकार ते नटसम्राट असा प्रवास करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नाना पाटेकर यांचे व्यक्तिमत्त्व अजित औरवाडकर यांनी कृष्णधवल रांगोळीतून साकारले आहे. ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी त्यांना तब्बल आठ तासांचा कालावधी लागला.

वडगाव येथील ज्योती फोटो स्टुडिओमध्ये ही रांगोळी साकारण्यात आली आहे. नाना पाटेकर यांच्याप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करणाऱ्या या कलाकृतीला कलाप्रेमींना भेट देता येणार आहे. ही रांगोळी सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत पाहण्यासाठी खुली राहणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

आंतरराष्ट्रीय ख्यातीची जंबो सर्कस 25 आॕक्टो.पर्यंत सीपीएड मैदानावर

Spread the love  बेळगांव : जगप्रसिद्ध जंबो सर्कस बेळगाव शहरात दाखल झाली असून, आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *